इंदापूर नगरपरिषदेला देश पातळीवर सलग चौथ्या वर्षी ओडीएफ मानांकन
नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केला स्वछतादूतांचा सन्मान

इंदापूर नगरपरिषदेला देश पातळीवर सलग चौथ्या वर्षी ओडीएफ मानांकन
नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केला स्वछतादूतांचा सन्मान
इंदापूर : प्रतिनिधी
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेअंतर्गत इंदापूर नगरपरिषदेला देश पातळीवर सलग चौथ्या वर्षी ओडीएफ मानांकन मिळाले आहे.त्यामुळे नगराध्यक्षा अंकिता शहा व मुकुंद शहा यांनी इंदापूर शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता उत्तमपणे राखणाऱ्या सर्व स्वच्छतादुतांचा सन्मान केला.
याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की, चला हातात हात मिळवूया दुर्गंधी ला इंदापूर शहरातून बाहेर पळवूया या प्रमाणे स्वच्छतादुतांनी अपार कष्टाने शौचालयांची देखभाल करत अस्वच्छता होऊ नये, शौचालये कशी स्वच्छ राहतील याची काळजी घेतली. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. जशी तुम्ही इंदापूर शहरातील नागरिकांची स्वच्छतेबद्दल काळजी घेतात तशी तुम्ही स्वतःची काळजी घेत कामे करावी. आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ वरील लस घेणे आवश्यक आहे. सर्वजण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी न करता इंदापूर शहरातील नागरिकांच्या काळजीपोटी हे काम करत आहात म्हणून तुम्हाला सुद्धा तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेणे जरुरीचे आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय येथे नोंदणी करून लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे हे खूप गरजेचे असल्याचे शहा यांनी नमूद केले.
यावेळी स्वच्छतादूत राहुल वाघेला, दीपक सोलंकी, रोहन चव्हाण, कुणाल चव्हाण, शैलेश सोलंकी, शितल वाघेला, तानसिंग सोलंकी, महावीर मिसाळ, दिनेश वाघेला यांसह इंदापूर बस स्थानक येथे शौचालयाची स्वच्छता उत्कृष्ट प्रकारे ठेवल्याबद्दल तेथील कर्मचारी दुखन राम व संतोष ढावरे यांचा देखील शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान अंकिता शहा व मुकुंद शहा यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर प्रसंगी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नोडल ऑफिसर गोरक्षनाथ वायाळ, मनोज बारटक्के, सहाय्यक आरोग्य निरीक्षक सुनील लोहिरे,पाणीपुरवठा पर्यवेक्षक सुरेश सोनवणे, दीपक शिंदे, अंबादास नाळे, धनाजी भोंग व इतर नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताफ पठाण यांनी केले.