इंदापूर नगर परिषदेकडून ५ टक्के निधी खात्यात जमा झाल्याने दिव्यांग बांधवांकडून नगराध्यक्षा शहा यांचा सत्कार
१०४ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा

इंदापूर नगर परिषदेकडून ५ टक्के निधी खात्यात जमा झाल्याने दिव्यांग बांधवांकडून नगराध्यक्षा शहा यांचा सत्कार
१०४ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर नगरपरिषदेच्या २०२०-२१ च्या अंदाजपत्रकानुसार ५ टक्के प्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांना प्रति लाभ ९ हजार रुपये प्रमाणे १०४ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकत्रित एकूण ९ लाख ३६ हजार रुपये रक्कम आरटीजीएस द्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. यामुळे दिव्यांग बांधवाकडून इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा तसेच नगरसेवक भरत शहा यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दिव्यांग संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडुळे, अनंत गायकवाड, सचिन सूर्यवंशी, भोसले, अमीर शेख, रत्नपाल पाडुळे उपस्थित होते.
दरवर्षी नियमित इंदापूर नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकाच्या ५ टक्के रक्कम दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने या लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत इंदापूर नगरपालिका आणि नगराध्यक्षा, नगरसेवक, कर्मचारी यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
शासनाच्या सर्व योजना इंदापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवित नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न इंदापूर नगरपरिषदेचा असतो अशी प्रतिक्रिया यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी व्यक्त केली.