इंदापूर पंचायत समितीला ‘आयएसओ’ मानांकन ; खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत केले अभिनंदन
आय.एस.ओ मानांकन मिळणे तालुक्यासाठी अभिमानास्पद

इंदापूर पंचायत समितीला ‘आयएसओ’ मानांकन ; खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत केले अभिनंदन
आय.एस.ओ मानांकन मिळणे तालुक्यासाठी अभिमानास्पद
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर पंचायत समितीला इंटरनॅशनल स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशनचे (आयएसओ) मानांकन मिळाले असून इंदापूर तालुका व जिल्हा पातळीवर पंचायत समितीला नावलौकिक प्राप्त झाला आहे.आय.एस.ओ मानांकन मिळणे तालुक्यासाठी अभिमानास्पद असून मानांकन मिळाल्याने बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत ट्विट करत सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन देखील केले आहे.
याबाबत इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट म्हणाले की,यशवंतराज पंचायत अभियानाअंतर्गत इंदापूर पंचायत समितीने राज्य सरकारच्या महत्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, आंतर विभागीय समन्वय,लाभार्थ्यांना तत्पर सेवा,झिरो पेंडन्सी अशा विविध बाबींवर पंचायत समितीने विशेष लक्ष केंद्रित केले. अद्ययावत अभिलेख कक्ष, सौर ऊर्जेचा वापर सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे निगराणी या बाबींमुळे पंचायत समितीचे वेगळेपण अधोरेखित झाले आहे.
या मानांकनासाठी पंचायत समितीचे सभापती,उपसभापती,इंदापूर तालुक्यातील सर्व सरपंच,उपसरपंच तसेच विविध गावातील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले तसेच बहुमोल सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व भविष्यात देखील असेच सहकार्य मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली आहे.