इंदापूर पंचायत समिती सभापती पदासाठी हर्षवर्धन पाटील गटाचा झेंडा राष्ट्रवादीवर दणदणीत विजय.
सभापतीपदी स्वाती शेंडे

इंदापूर पंचायत समिती सभापती पदासाठी हर्षवर्धन पाटील गटाचा झेंडा राष्ट्रवादीवर दणदणीत विजय.
सभापतीपदी स्वाती शेंडे
बारामती वार्तापत्र
इंदापूर पंचायत समिती सभापती पदाची माळ काटी गणातील स्वाती शेंडे यांच्या गळ्यात पडली,तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल वणवे यांचा पराभव झाला.
पंचायत समिती सभापती पुष्पा रेडके यांनी सभापती पदाचा स्वच्छेने राजीनामा दिल्यानंतर रिक्त सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली, या वेळी सभापती पदासाठी हर्षवर्धन पाटील समर्थक स्वाती शेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शेटफळगडे गणाच्या राष्ट्रवादीच्या सदस्य शीतल वनवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मतदान प्रक्रिया झाल्यानंतर शीतल वनवे यांना ५ मते मिळाली तर स्वाती शेंडे यांना ८ मते मिळाली.
निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी कामकाज पाहिले.
२०१७ साली झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ८सदस्य निवडून आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ६ सदस्य निवडून आले होते, या वेळी कॉग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव करत पंचायत समितीवर सत्ता मिळवली होती.
विधानसभेच्या दरम्यान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने पंचायत समितीचे सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पाठिशी उभे राहत त्यांना साथ दिली होती.
या वेळी बोलताना नवनिर्वाचित सभापती स्वाती शेंडे म्हणाल्या की माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी काम करू,सर्वसामान्य लोकांना पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तत्पर राहू.
या वेळी माजी सभापती पुष्पा रेडके यांचा उत्कृष्ट कामकाजा बद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार केला व त्याचा कामाचे कौतुक केले.या वेळी माजी सभापती करणसिंह घोलप व सदस्य हेमंत नरुटे यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी नवनियुक्त सभापती स्वाती शेंडे यांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की माजी सभापती पुष्पा रेडके यांनी चांगले काम केले, कोरोना काळात आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली,महिलांना बचतगटाच्या माध्यमातून मदत केली.त्याच पद्धतीने नवनियुक्त सभापती स्वाती शेंडे यांनी सामान्य माणसाच्या हिताचे काम करावे असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, उदयसिह पाटील, माजी सभापती करणसिह घोलप, उपसभापती संजय देहाडे, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, माजी सभापती विलासराव वाघमोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील, गटनेते कैलास कदम, व पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते, या वेळी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकत्यांनी आनंद उत्सव साजरा केला या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.