इंदापूर पोलिसांची कारवाई..८० हजार रुपये किंमतीची देशी-विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना ताब्यात
दारूच्या पस्तीस बॉक्स सह एकूण 3 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त
इंदापूर पोलिसांची कारवाई..८० हजार रुपये किंमतीची देशी-विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना ताब्यात
दारूच्या पस्तीस बॉक्स सह एकूण 3 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील मौजे काटी-रेडा रोडवरील पाटील डेरी समोर रात्रीची गस्त घालत असताना एका सिल्वर रंगाच्या मारुती कार गाडी मधून विदेशी दारूचे पस्तीस बॉक्स घेऊन जात असताना इंदापूर पोलिसांनी कारवाई केली असून या कारवाईमध्ये तब्बल ८० हजार रुपये किंमतीची विदेशी दारू व ३ लाख रुपये किंमतीची गाडी असा एकूण ३८०००० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,काल सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील काटी – रेडा या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या सिल्व्हर रंगाच्या मारुती कारमधून दारूची वाहतूक होत असल्याचे समजल्यावरून पोलिसांनी रस्त्यावरील पाटील डेअरी समोर ही कार ताब्यात घेताच या मध्ये दारूचे पस्तीस बॉक्स आढळून आले.
इंदापूर पोलिसांनी देशी-विदेशी दारूच्या बॉक्स मधील 80 हजार रुपये किमतीची दारू व तीन लाख रुपये किंमतीची मारुती कार असा एकूण तीन लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
सदर तक्रार पो.ना. मनोज प्रवीण गायकवाड यांनी दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस नागनाथ निरीक्षक पाटील करत आहेत.
(गडचिरोली वरून इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये नुकतेच काही महिन्यांपूर्वी रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन मोठ्या कारवाई केल्या असून त्यातील ही दुसरी कारवाई आहे.)