इंदापूर पोलिसांच्या ताफ्यात स्पीड बोट समाविष्ट ; वाळू कारवाईत होणार मदत
वाळू माफियांचे धाबे दणाणले

इंदापूर पोलिसांच्या ताफ्यात स्पीड बोट समाविष्ट ; वाळू कारवाईत होणार मदत
वाळू माफियांचे धाबे दणाणले
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर पोलिसांच्या ताफ्यात स्पीड बोट बुधवारी ( दि.४ ) समाविष्ठ करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर इंदापूर पोलीस व महसुलची कारवाई चालू असतानाच आता स्पीड बोटची भर पडल्याने वाळू कारवाईत मदत होणार आहे.
भल्या मोठ्या उजनी पाणलोट क्षेत्रात कारवाई दरम्यान इंदापूर पोलीस व महसूल विभागाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.कारवाईची कानकुन लागताच वाळू माफिया पुणे जिल्हा क्षेत्राच्या भागातून सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा भागातील नदी काठी यांत्रिकी बोटी घेऊन धूम ठोकत होते मात्र सदरील यांत्रिकी बोटीमुळे नदी पात्राच्या मध्यभागी जाऊन देखील कारवाई करण्यास सोयीस्कर होणार आहे.
सदरील यांत्रिकी स्पीड बोटीची चाचणी शुक्रवारी ( दि.६ ) उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात चाचणी करण्यात आली असून सदर प्रात्यक्षिका वेळी तहसीलदार अनिल ठोंबरे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे,सपोनि माने, पोलीस नाईक झरेकर, पोलीस कॉन्स्टेबल सय्यद, अमोल गारुडी, महिला पोलिस कॉन्स्टेबल जगताप,इंगवले तसेच पोलीस पाटील सुनील राऊत,पोलीस मित्र बापू झगडे,राजेंद्र शिंदे, अरुण कांबळे तसेच महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.