
इंदापूर पोलीस ठाण्याचा कार्यभार तयूब मुजावर यांच्या हाती
पोलीस दलात मोठे फेरबदल
इंदापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील पोलीस विभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. विविध पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून गेल्या आठ महिण्यापासून इंदापूर पोलीस ठाण्यास पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे धन्यकुमार गोडसे यांची सोलापूर ग्रामीण मध्ये बदली झाली.
त्यानंतर इंदापूरची सूत्रे कोणाच्या हाती सोपवली जाणार याची उत्सुकता होती,यास आता पूर्णविराम मिळाला आहे.लोणावळा ग्रामीण इथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे तयूब युनूस मुजावर यांची इंदापूर या ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दि.19 आँगस्ट 2021 रोजी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयाने या संदर्भातील अध्यादेश काढला आहे.
भिगवण व वालचंदनगर ठाण्याचे अधिकारीही बदलले…
इंदापूर तालुक्यातील प्रमुख असणाऱ्या वालचंदनगर व भिगवण ठाण्यातही फेरबदल करण्यात आले आहेत. वालचंदनगर पोलीस ठाण्याचा कारभार पाहत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांकडे भिगवण पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांकडे वालचंदनगर ठाण्याचा कार्यभार असेल.
त्याचबरोबर भिगवण पोलीस ठाण्यात स्वच्छ कारभार करुन आपल्या कामाची चुनूक दाखवत सर्वसामान्य जनतेशी घट्ट नाळ जोडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांकडे पुणे जिल्ह्यातील घोडेगांव पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर इंदापूर येथे कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार धोत्रे यांची ही बदली करण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील वाचक खेड विभागात त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.