इंदापूर प्रशासकीय भवनासमोर राज्य शासनाने कृषि विधेयकाला दिलेल्या स्थगिती आदेशाच्या प्रति जाळल्या
कृषी विधेयक राज्य सरकारने त्वरित लागू करण्याच्या मागणीकरीता तहसीलदारांना निवेदन
इंदापूर प्रशासकीय भवनासमोर राज्य शासनाने कृषि विधेयकाला दिलेल्या स्थगिती आदेशाच्या प्रति जाळल्या
कृषी विधेयक राज्य सरकारने त्वरित लागू करण्याच्या मागणीकरीता तहसीलदारांना निवेदन
बारामती वार्तापत्र
केंद्र सरकारने पारित केलेले ऐतिहासिक कृषी विधेयक मंजूर केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु महाराष्ट्र शासन व सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास विनियमन) १९६३ नुसार सदर विधेयकास महाराष्ट्रात लागू करण्यासाठी दिलेली स्थगिती शेतकऱ्यांच्या हिताची नाही तरी राज्य सरकारने दिलेली स्थगिती त्वरीत मागे घ्यावी व केंद्र सरकारने कृषी विधेयक पारीत केले आहे ते राज्य सरकारने त्वरित लागू करावे अशा आशयाचे असलेले निवेदन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे दिले असून विधेयक मान्य न केल्यास शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत प्रशासकीय भवनाच्या समोर कृषि विधेयकाला दिलेल्या स्थगिती आदेशाच्या प्रति भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जाळण्यात आल्या.
यावेळी माजी आमदार रामराव वडकुते, किसान मोर्चा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख माऊली चवरे , भाजपा तालुकाध्यक्ष शरद जामदार, युवामोर्चा अध्यक्ष राम आसबे, संदिप आंदलिग, गणपत करे, राजकुमार जठार, रामराजे आसबे, महेबुब मोमीन, चाँद पठाण उपस्थित होते.