इंदापूर

इंदापूर बाह्यवळणावर अपघातात दोन जण जागीच ठार

टिपर चालकावर गुन्हा दाखल

इंदापूर बाह्यवळणावर अपघातात दोन जण जागीच ठार

टिपर चालकावर गुन्हा दाखल

बारामती वार्तापत्र
हायवा टिप्पर बाह्यवळणावरून जाताना अचानक पणे ब्रेक दाबून  वाहन मागे घेताना दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वराची पत्नी व  पुतणी जागीच ठार झाल्याची घटना इंदापूरमध्ये घडली आहे.

प्रियंका सोमनाथ जाधव (वय 19 वर्षे ) ज्ञानेश्वरी किरण जाधव (वय दोन वर्षे)  असे अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत दुचाकीस्वार सोमनाथ रमेश जाधव( वय 24 वर्षे)  मूळ राहणार चांदज,तालुका-माढा जिल्हा सोलापूर सध्या राहणार घोडके नगर रुई  तालुका बारामती जिल्हा पुणे यांनी  इंदापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी पत्नी प्रियंका व माझ्या भावाची मुलगी ज्ञानेश्वरी यांना घेऊन मी माझ्या दुचाकी  क्रमांक एम. एच. 45 ए.के. 7215 यावरून बारामतीहुन माझ्या मूळ गावी चांदज येथे माझ्या भावाचे लग्न असल्याने निघालो होतो. इंदापूर येथे चौकातून बाह्यावळणाच्या सेवा रस्त्याने जात असताना हायवा टिपर क्रमांक एम. एच. 42 ए.  क्यु . 4097 हा चालला होता त्याच्या पाठीमागून आम्ही चाललो असताना सदर टिपर  चालकाने अचानक ब्रेक दाबला व ट्रक रोड वरती उभा राहिल्याने पाठीमागे  मीही माझे मोटरसायकलचा ब्रेक दाबला व मोटर सायकल उभी केली सदर हायवा ट्रक चालकाने अचानक  वाहन मागे घ्यायला सुरुवात केली.  त्यावेळी मी त्यास मोठमोठ्याने हॉर्न  वाजवला व आवाज दिला पण त्याने वेगात टिपर रिव्हर्स ने मागे घेतला त्यावेळी टिपरचा माझ्या मोटरसायकल ला उजव्या बाजूला ठोस बसून अपघात झाला. आम्ही खाली पडलो त्यावेळी ड्रायव्हर बाजूचे चाक माझी पत्नी प्रियांका व पुतणी ज्ञानेश्वरी यांच्या अंगावरून गेले. या अपघातात माझी पुतणी ज्ञानेश्वरी ही जागेवरच मयत झाली. तर प्रियंका हिला इंदापुरात रुग्णालयात उपचारासाठी आणले.  मात्र डॉक्टरांनी दोघीही  मयत झाल्याचे सांगितले.

हायवा टिपर चालक सोमनाथ सुभाष राऊत राहणार –  बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास इंदापूर पोलिस करीत आहेत.

Related Articles

Back to top button