इंदापूर मधील आशा सेविकांचे काम बंद आंदोलन
संबंधीत व्यक्तीवर प्रशासनाने ताबडतोब कारवाई करून कठोर शिक्षा करावी

इंदापूर मधील आशा सेविकांचे काम बंद आंदोलन
संबंधीत व्यक्तीवर प्रशासनाने ताबडतोब कारवाई करून कठोर शिक्षा करावी
इंदापूर प्रतिनिधी ; बारामती वार्तापत्र
आशा सेविकांना अँटिजन टेस्टचं प्रशिक्षण देणार आणि म्यूकरमायकोसिसवर मोफत उपचार करणार अशी घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. मंत्री टोपे यांच्या या घोषणेनंतर माध्यमांनी ही बातमी प्रकाशित केली. डेली हंन्ट वर देखील ही बातमी पब्लिश झाली. दि.25 रोजी या बातमीला एका अज्ञाताने सोशल मिडीयाव्दारे गलिच्छ शब्दात प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रिये नंतर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संतप्त झाल्या असून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला जातोय.आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकावर सोशल मिडीयांवर आश्लिल मॅसेज करणाऱ्या वक्ती विरुध्द गुन्हा दाखल करावा त्याशिवाय आम्ही कोणीही काम करणार नाही असा पवित्रा आशा सेविकांनी घेतला आहे.महाराष्ट्र आशा – गटप्रवर्तक वर्कर्स युनियन च्या वतीने इंदापूर गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांना गुरूवारी दि.27 रोजी तसे लेखी पत्र देखील देण्यात आले आहे.
संबंधीत व्यक्तीवर प्रशासनाने ताबडतोब कारवाई करून कठोर शिक्षा करावी. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तका या कोवीड-१९ च्या काळात शूरवीरांसारखे तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत. त्यांच्याबद्दल असे बोलणाऱ्या व्यक्तीला जो पर्यंत अटक करून कायदेशीर कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही. तसेच प्रशासनाने या विषयी गंभीरपणे दखल न घेतल्यामुळे आम्ही तिव्र निषेध करत आहोत असं अर्चना गोरड,इंदापूर तालुका सचिव यांनी सांगितले आहे.