इंदापूर मधील धक्कादायक घटना व्यापारी गाळ्यातील जिन्यामध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
उपस्थित डॉक्टरांनी तपासून रोहित मयत झाल्याचे सांगितले

इंदापूर मधील धक्कादायक घटना व्यापारी गाळ्यातील जिन्यामध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
उपस्थित डॉक्टरांनी तपासून रोहित मयत झाल्याचे सांगितले
निलेश भोंग ; बारामती वार्तापत्र
तहसील कचेरी शेजारील व्यापारी गाळ्यातील जिन्यामध्ये लोखंडी पाइपला दोरीने गळफास घेऊन इंदापुर शहरातील वेंकटेशनगर येथील युवकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. रोहित उर्फ श्याम सतीश बोरीकर (वय 25 वर्ष रा. व्यंकटेशनगर, इंदापूर जिल्हा पुणे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मयताचा भाऊ राहुल सतीश बोरीकर याने इंदापुर पोलीस ठाण्यात खबर दिली.
गुरुवारी दुपारी सव्वादोनच्या पूर्वी रोहित उर्फ श्याम बोरीकर याने इंदापूर शहरातील शंभर फुटी रोड वर असणाऱ्या तहसिल कचेरी शेजारील असलेल्या गाळ्या मधील दारूच्या दुकानाच्या वरील तिसऱ्या मजल्यावर जिन्यामध्ये लोखंडी पाइपला दोरीने गळफास घेतला.याची माहिती समजताच राहुल बोरीकर यांनी तिथे जाऊन त्यास खाली उतरून ताबडतोब रुग्णवाहिकेतून उपचारकामी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल. यावेळी तेथे उपस्थित डॉक्टरांनी तपासून रोहित मयत झाल्याचे सांगितले.पुढील तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वाघ हे करत आहेत..