इंदापूर महाविद्यालयात अद्ययावत स्टुडिओ उभारणार- हर्षवर्धन पाटील.
आय कॉलेज येथे एल.एम. एस चे उदघाटन.
इंदापूर महाविद्यालयात अद्ययावत स्टुडिओ उभारणार- हर्षवर्धन पाटील.
आय कॉलेज येथे एल.एम. एस चे उदघाटन.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तयार केलेल्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमसाठी इंदापूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय हे मॉडेल महाविद्यालय म्हणून निवड झाली आहे. या आय कॉलेज एल.एम. एस चे उदघाटन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ ऑनलाइन टिचिंग अँड लर्निंग ही आजच्या लॉकडाउनच्या काळात काळाची गरज निर्माण झाली असून त्यासाठी आपण सर्वांनी तयार असले पाहिजे याशिवाय पर्याय नाही. याच अनुषंगाने इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळातील विद्यालय व महाविद्यालयांना उपयोगी होईल अशी मध्यवर्ती स्टुडिओची निर्मिती लवकरच इंदापूर महाविद्यालयामध्ये केली जाईल. शिक्षकांना आवाहन करताना ते म्हणाले की आपणाला ऑनलाइन टिचिंग संदर्भात सुधारणा केल्या पाहिजेत. आपले ज्ञान अद्ययावत केले पाहिजे जेणेकरून covid-19 च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शिक्षण कार्यात गुंतवून ठेवण्यास एल. एम. एस. सारख्या उपक्रमाचा फायदा होणार आहे.
यावेळी वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी e-content या सॉफ्टवेअरच्याद्वारे सादरीकरण केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भिगवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज,उपप्राचार्य प्रा.नागनाथ ढवळे, डॉ.भिमाजी भोर, डॉ शिवाजी वीर , प्रा.सदाशिव उंबरदंड, प्रा.अशोक पाटील, प्रा. धनंजय भोसले, डॉ. राजाराम गावडे, डॉ. रामदास ननवरे, प्रा. संदीप शिंदे, प्रा. दिगंबर बिरादार उपस्थित होते.
आभार प्रा.अशोक पाटील यांनी मानले.