इंदापूर महाविद्यालयास एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व सैराट फेम तानाजी गळगुंडे यांची सदिच्छा भेट
महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची घेतली माहिती
इंदापूर महाविद्यालयास एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व सैराट फेम तानाजी गळगुंडे यांची सदिच्छा भेट
महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची घेतली माहिती
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास बुधवारी (दि.१३)
गिनीज बुक रेकॉर्ड धारक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व सैराट फेम् तानाजी गळगुंडे यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या हस्ते आनंद बनसोडे व तानाजी गळगुंडे यांचा देशी वृक्षाचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी आनंद बनसोडे यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेऊन महाविद्यालयाचे कौतुक केले. तसेच पर्यावरण विषयक जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये करावी असेही आवाहन केले. तर तानाजी गळगुंडे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर कला, साहित्य व क्रीड़ा या क्षेत्राकडे देखील करिअर म्हणून पहावे असे मत व्यक्त केले. माणसाचे आयुष्य हे एक रंगमंच आहे या रंगमंचावर वेगवेगळया भूमिका सादर करीत असताना विद्यार्थी दशेतील भूमिका नेहमीच अविस्मरणीय असते असे देखील यावेळी त्यांनी बोलून दाखविले.
यावेळी डॉ.भरत भुजबळ, डॉ. राजेंद्र भोसले, प्रा. श्रीनिवास शिंदे, डॉ. राजाराम गावडे, प्रा. बाळासाहेब काळे, प्रा. धनंजय भोसले, डॉ. तानाजी कसबे, डॉ. गजानन कदम, डॉ. सीताबाई पवार, डॉ. महंमद मुलाणी, प्रा. बापू घोगरे, मयूर मखरे व गणेश गाडेकर उपस्थित होते.