इंदापूर येथील जबरी चोरीचे गुन्हयातील आरोपी ताब्यात : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी
धारदार शस्त्र घेवून येवून शस्त्राचा धाक दाखवून चोरी

इंदापूर येथील जबरी चोरीचे गुन्हयातील आरोपी ताब्यात : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी
धारदार शस्त्र घेवून येवून शस्त्राचा धाक दाखवून चोरी
क्राईम ; बारामती वार्तापत्र
दिनांक १५/१२/२०२० रोजी रात्री ०३.०० वा.चे सुमारास इंदापूर बायपास ता.इंदापूर जि.पुणे येथे यातील फिर्यादी अंकुश गोरोबा काळे रा.आरे कॉलनी , मुंबई हे त्यांचे आई, वडील व भाऊ यांचेसह त्यांचेकडील अल्टो कार मधून मुंबई येथून गावी उस्मानाबाद येथे जात असताना इंदापूर शहरातील बायपास रोडला देशपांडे व्हेज हॉटेलजवळ लघुशंकेसाठी रोडचे कडेला थांबले असताना त्या ठिकाणी अज्ञात ४ इसमांनी हातात धारदार शस्त्र घेवून येवून शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादी व अल्टो कार मधील इतर ३ साक्षीदार यांना मारहाण करुन सोन्याचे दागिने, घडयाळ, एटीएम कार्ड व रोख रक्कम २०,०००/- असा एकूण ४६,०००/- रुपयाचा ऐवज जबरीने चोरी करुन नेला . त्याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन इंदापूर पो.स्टे. गु.र.नं. ११९९/२०२० भादंवि क.३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयात यापूर्वी एक विधिसंघर्षित बालक यास ताब्यात घेण्यात आलेले होते. सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी नामे घोष पिंटू काळे वय १९ वर्षे रा.राक्षसवाडी ता.कर्जत जि.अहमदनगर हा गुन्हा घडले पासून फरार होता .
मा.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आदेशाने रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना, आज दिनांक २२/५/२०२१ रोजी LCB टिमला सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी हा त्याचे गावी राक्षसवाडी ता.कर्जत येथे येणार असल्याची बातमी मिळालेवरुन त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी नामे घोष पिंटू काळे वय १९ वर्षे रा.राक्षसवाडी ता.कर्जत जि.अहमदनगर यास ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन त्यास पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे .
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट, सपोनि सचिन काळे, पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा. सुभाष राऊत, पो.ना. गुरु गायकवाड यांनी केलेली आहे.