इंदापूर येथील जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जी. एन. एम अभ्यासक्रम सुरू
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने दिली मान्यता
इंदापूर येथील जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जी. एन. एम अभ्यासक्रम सुरू
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने दिली मान्यता
इंदापूर :प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने इंदापूर येथील जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या संस्थेला जी. एन. एम अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत नायकुडे यांनी दिली.
जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग संस्थेला दिनांक 29 जानेवारी 2021 च्या शासन निर्णयाद्वारे जी. एन. एम या नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी 60 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची मान्यता देण्यात आली. त्यापैकी पुरुष विद्यार्थ्यांची संख्या 18 तर विद्यार्थिनींची संख्या 42 असणार आहे. जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग संस्थेमध्ये ए. एन. एम अभ्यासक्रम 2008 पासून सुरू आहे. संस्थेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनी राज्य शासनाच्या आरोग्य विभागात तर काही विद्यार्थिनी पुणे व मुंबई येथील नामांकित रुग्णालयात कार्यरत आहेत.
संस्थेला आय एस ओ चे मानांकन प्राप्त असून संस्थेची प्रशस्त इमारत आहे तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सोय उपलब्ध आहे. संस्थेने जागतिक कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या कालावधीत शासनाला मदत केली आहे. संस्थेमधील विद्यार्थिनींनी कोरोना प्रादुर्भाव असलेल्या व्यक्तींचा सर्वेक्षण जलद रीतीने केले. पुणे, मुंबई आणि शासकीय, स्थानिक खाजगी रुग्णालयात संस्थेच्या विद्यार्थिनी रुग्णांची सेवा केली आहे. जीएनएम अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थेच्या सचिव लता नायकुडे, संचालिका उर्मिला नायकुडे, प्राचार्या अनिता मखरे यांनी परिश्रम घेतले.