इंदापूर येथील विद्यमान नगरसेविकेच्या पतीने पुणे येथे उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.
राजकारणातला जाइंट किलर हरपल्याने संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

इंदापूर येथील विद्यमान नगरसेविकेच्या पतीने पुणे येथे उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.
राजकारणातला जाइंट किलर हरपल्याने संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
इंदापूर शहरातील राजकारणात बुद्धिवादी म्हणून ओळख असणारे विद्यमान नगरसेविकेचे पती यांची आज दि.१५ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
सदर व्यक्तीस दि.१२ जून रोजी शारिरीक त्रास होऊ लागल्याने पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले होते,तेव्हा पासून जवळपास पंचवीस दिवस त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचारानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली त्यांनी कोरोनाविरुध्द ची लढाई जिंकली होती,त्यानंतर दि.७ जुलै रोजी त्यांना घरी सोडण्यात आले होते परंतु घरी आल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली त्यामुळे त्यांना पुन्हा उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले आहे.
सदरची व्यक्ती ही तालुक्यात परिचित असल्याने अचानक मृत्युच्या बातमीने नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.