इंदापूर

इंदापूर येथे अंगणवाडी सेविकांचे ‘मोबाईल वापसी’ आंदोलन

विविध घोषणाबाजी करत मागितला न्याय

इंदापूर येथे अंगणवाडी सेविकांचे ‘मोबाईल वापसी’ आंदोलन

विविध घोषणाबाजी करत मागितला न्याय

इंदापूर : प्रतिनिधी

पोषण अभियानाअंतर्गत सन २०१९ मध्ये इंदापूर तालुक्यातील प्रकल्प एक व प्रकल्प दोनसाठी एकूण ४११ मोबाईल अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी वाटप करण्यात आले होते.हे मोबाईल अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे म्हणत इंदापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी गुरुवारी ( दि.२ ) इंदापूर पंचायत समिती आवारात विविध घोषणाबाजी करत सदरील मोबाईल (भ्रमणध्वनी) शासनाकडे परत करण्यासाठी आंदोलन केले.

यावेळी बोलताना अंगणवाडी सेविका संघटनेच्या तालुकाध्यक्षा बकुळाताई शेंडे म्हणाल्या की,पोषण अभियानांतर्गत सन २०१९ मध्ये राज्यातील १ लाख ५ हजार ५९२ अंगणवाडी सेविकांना शासकीय कामांसाठी मोबाईल वाटप करण्यात आले होते. सदरील मोबाईलचा हमी कालावधी दोन वर्षे असून देखील तो कालावधी २०२१ मध्ये संपला. मोबाईल मध्ये लाभार्थ्यांची नावे,हजेरी,वजन,उंची,स्तनदा व गर्भवती मातांची माहिती,पोषण आहाराचे वाटप इत्यादी माहिती भरण्यात येत असते परंतु या मोबाईलमध्ये २ जीबी ( साठवून क्षमता ) असल्याने मोबाईल (भ्रमणध्वनी) बंद होतात,काम करत असताना मोबाईल गरम झाल्याने काम करणे कठीण होते.त्यामुळे मोबाईल सतत नादुरुस्त होतो.त्याच्या दुरुस्तीसाठी ३ ते ८ हजारापर्यंत खर्च होतो व तो खर्च अंगणवाडी सेविकांकडून वसूल केला जातो.

महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी असताना इंग्रजी अँपमध्ये माहिती भरण्याची जबरदस्ती करणे बेकायदेशीर आहे.सध्याचे मोबाईल (भ्रमणध्वनी) निकृष्ट व सदोष असल्याने चांगल्या प्रतीचे मोबाईल द्या,मराठी भाषेतील पोषण शोधक अँप द्या,अशा मागण्यांसंदर्भात अंगणवाडी सेविकांनी गेल्या पंधरा दिवसात प्रकल्प अधिकाऱ्यांकडे लेखी सादर केले असून प्रशासनाने काहीही प्रतिसाद दिलेला नसल्याने सदरील आंदोलन करण्यात आले. दरम्यान प्रशासनाकडून अंगणवाडी सेविकांचे भ्रमणध्वनी स्वीकारले नसल्याने एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात भ्रमणध्वनी ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.

दरम्यान एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प अधिकारी संदीप काळे यांना विचारले असता ते म्हणाले की,सदरील अंगणवाडी सेविकांचे निवेदन यापूर्वीच स्वीकारले असून वरिष्ठांना याबाबत माहिती दिलेली आहे,परंतु वरिष्ठांनी भ्रमणध्वनी परत घेण्याच्या सुचना दिल्या नाहीत.त्यामुळे अंगणवाडी सेविकांना स्वतःच्या जबाबदारीवर भ्रमणध्वनी ठेवावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!