इंदापूर येथे अल्पशी विश्रांती घेत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी पंढरपूरकडे रवाना…
संतश्रेष्ठ तुकोबारायाच्या पादुका इतिहासात पहिल्यांदाच बसमध्ये पंढरीकडे मार्गस्थ.
इंदापूर येथे अल्पशी विश्रांती घेत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी पंढरपूरकडे रवाना…
संतश्रेष्ठ तुकोबारायाच्या पादुका इतिहासात पहिल्यांदाच बसमध्ये पंढरीकडे मार्गस्थ
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्रातील प्रमुख मानाच्या ९ पालख्यांना पंढरीकडे येण्याची परवानगी दिली होती त्या मधील संतश्रेष्ठ तुकोबारायांची पालखी आज दि.३० जून रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात काही वेळ विसाव्यासाठी थांबली. पण यंदा कोरोनाची साथ असल्याने पालखी मुक्कामी न थांबता काही क्षणात मार्गस्थ झाली.
फुलांनी सजवलेल्या एस. टी. बसमधून पालखी वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे बसमधून पांडुरंगाच्या भेटीला जाणार आहे. कोरोनाच्या सावटामुळे अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे दरवर्षी काही दिवसांनंतर पोहोचणारी पालखी यंदा मात्र अवघ्या काही तासातच पंढरपुरात दाखल होणार आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर,प्रातं अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी,मुख्याधिकरी डाॅ.प्रदीप ठेंगल,नगराध्यक्षा अंकिता शहा, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरसेवक अनिकेत वाघ,श्रीधर बाब्रस, सुनिल मोहिते, यांसह पोलीस कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी पालखी सोहळा प्रमुख विशाल मोरे,संतोष मोरे आणि माणिकराव मोरे यांसह बस मध्ये २० वारकरी होते.
उपस्थित सर्व वारकऱ्यांना प्रशासनाकडून चहा नाष्टा देण्यात आला.
प्रसंगी बोलताना सोहळा प्रमुख माणिकराव मोरे यांनी
सर्व वारकऱ्यांना एकच आव्हान केले की उद्या आषाढी एकादशी ला एका देशी वृक्षाची लागवड करा व त्याला प्रदक्षिणा घाला तीच पांडुरंगाला आणि पंढरीला प्रदक्षिणा होईल.
जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर कर हेच विठ्ठलाला साकडे आहे-ह.भ.प माणिकराव मोरे.