इंदापूर येथे जळालेल्या कुल्फी कारखान्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली पाहणी
नुकसान भरपाईसाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची दिली ग्वाही

इंदापूर येथे जळालेल्या कुल्फी कारखान्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली पाहणी
नुकसान भरपाईसाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची दिली ग्वाही
इंदापूर : प्रतिनिधी
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे बुधवारी (दि.१८) इंदापूर येथे सुनिश्चित दौऱ्यावर होते.यावेळी त्यांनी इंदापूर येथील आंबेडकर नगर परिसरात सोमवारी ( दि.१६ ) शॉर्ट सर्किट होऊन जळालेल्या कुल्फी कारखान्यास भेट देऊन पाहणी केली.प्रसंगी त्यांनी नामदेव शिंदे यांकडून माहिती घेऊन नुकसान भरपाईसाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
सदरील शिंदे मामा कुल्फी कारखान्यास सोमवारी भीषण आग लागली होती,यामध्ये नजीकची पिठाची गिरणी,किराणा दुकान व दोन पीक अप वाहने जळून लाखो रुपयांची वित्तहानी झाली होती.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे,जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे,बारामती लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सरवदे,तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे,शहराध्यक्ष अमोल मिसाळ,राकेश कांबळे,कार्याध्यक्ष महेश सरवदे ,विकास भोसले,सुनिल सोनवणे,प्रवीण मखरे,नितीन आरडे,राजाभाऊ घाडगे,प्रताप मिसाळ,भारत सावंत,अमोल भोसले व अन्य उपस्थित होते.