इंदापूर येथे भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू… 1 जण गंभीर जखमी
या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. 1 जण गंभीर जखमी आहे, मृत्यू मधील चार लोक पंढरपूर मधील असून एक जणाची अजून ओळख पटली नाही... पोलिस घटनास्थळी...

इंदापूर येथे भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू… 1 जण गंभीर जखमी
या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. 1 जण गंभीर जखमी आहे, मृत्यू मधील चार लोक पंढरपूर मधील असून एक जणाची अजून ओळख पटली नाही… पोलिस घटनास्थळी…
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
पुणे-सोलापूर महामार्गावरुन एर्टीगा (एम.एच ४६,बी ४५१५) ही कार पुण्याकडे जात असताना अचानक गाडीचा टायर फुटल्याने रस्त्यावरील दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येऊन सोलापुरकडे जाणाऱ्या बोलेरो (एम.एच १३ ए.झेड ३९०१) या गाडीला वेगात धडकली. या भीषण अपघातात बोलेरो गाडीमधील तीन तर एर्टीगामधील एक जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे.
इंदापूर शहरानजीक पुणे-सोलापूर महामार्गावर दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात होऊन चार जण जागीच ठार झाले आहेत. इंदापूर शहराजवळील एका हॉटेल जवळ दुपारच्या सुमारास ही भीषण घडली आहे.
प्राथमिक माहितीनुसार पुणे-सोलापूर महामार्गावरुन एर्टीगा (एम.एच ४६,बी ४५१५) ही कार पुण्याकडे जात असताना अचानक गाडीचा टायर फुटल्याने रस्त्यावरील दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येऊन सोलापुरकडे जाणाऱ्या बोलेरो (एम.एच १३ ए.झेड ३९०१) या गाडीला वेगात धडकली. या भीषण अपघातात बोलेरो गाडीमधील तीन तर एर्टीगामधील एक जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे.