इंदापूर शहरातील इलेक्ट्रिक दुकानात चोरी; चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इंदापूर शहरातील इलेक्ट्रिक दुकानात चोरी; चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातील खडकपुरा परिसरात असणाऱ्या हर्ष इलेक्ट्रॉनिक्स दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकानाची खिडकी तोडून दुकानात प्रवेश करत रोख रकमेसह इलेक्ट्रिक मालाची चोरी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी किशोर विठ्ठल पवार ( वय वर्षे ३८ ) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील खडकपुरा या ठिकाणी असणाऱ्या हर्ष इलेक्ट्रॉनिक्स दुकानात दि. १४ मार्च रात्री ८ ते १५ मार्च सकाळी ७ वाजण्याच्या वेळेत दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाला असणाऱ्या खिडकीचे गज वाकवुन व खिडकी तोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील गल्यामध्ये असलेले ८ हजार ६५० रुपयांसह २ हजार रुपयांची चिल्लर,२ हजार ६०० रुपये किमतीची कॉसमॉस कंपनीची बॅटरी,१२ हजार किंमतीचा सीसीटीव्ही संच असे एकूण २५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याची फिर्यादीत म्हंटले असून सदरील चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.व घटनेचा पुढील तपास इंदापूर पोलिस करत आहेत.