इंदापूर शहरातील ऐतिहासिक प्रवेशद्वाराची पडझड; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
इंदापूर शहरातील नागरिकांची तात्काळ दुरुस्तीची मागणी
इंदापूर शहरातील ऐतिहासिक प्रवेशद्वाराची पडझड; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
इंदापूर शहरातील नागरिकांची तात्काळ दुरुस्तीची मागणी
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
मालोजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूर नगरीतील ऐतिहासिक वारसा असणारे रामवेस नाका येथील प्रवेशद्वाराची पडझड काळाच्या ओघात आणि नैसर्गिक आपत्तींनी झाली आहे तर शहरातील असणाऱ्या गढ्यांची नामोनिशाणीही राहिलेली नाही. गढ्या म्हणजे इतिहासाचे साक्षीदार असून, त्यातून गत वैभवाचे दर्शन घडते.
चालू वर्षी इंदापूर शहरात झालेल्या अति मुसळधार पावसामुळे शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या ऐतिहासिक प्रवेशद्वाराची पडझड झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
या परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे या ठिकाणचे दगड अनेक वेळा ढासळत असल्याकारणाने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ताबडतोब दुरुस्ती करून ऐतिहासिक वारसा जपावा अशा मागणीचा जोर इंदापूर वाशीयांमधून धरू लागला आहे.