इंदापूर शहरातील ऐतिहासिक प्रवेशद्वार व तलाव प्राधान्याने दुरुस्त करण्याची काँग्रेस पक्षाची मागणी
पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी रामराजे कापरेंची घेतली भेट

इंदापूर शहरातील ऐतिहासिक प्रवेशद्वार व तलाव प्राधान्याने दुरुस्त करण्याची काँग्रेस पक्षाची मागणी
पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी रामराजे कापरेंची घेतली भेट
इंदापूर : प्रतिनिधी
मालोजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूर नगरीतील ऐतिहासिक वारसा असणारे रामवेस नाका येथील प्रवेशद्वार आणि शहरातील तलावाची काळाच्या ओघात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी काँग्रेस पक्षाकडून सोमवारी ( दि.१३ ) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांची भेट घेऊन करण्यात आली आहे.
इंदापूर शहरात गतवर्षी १४ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसात शहराच्या वेशीचे व तलावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.इंदापूर शहरातील विकासकामांसाठी वर्षभरात करोडो रुपयांचा निधी खर्च झाला मात्र पडझड झालेल्या ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष करण्यात आले.दोन्ही ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.त्यामुळे सदरील ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता असून याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.म्हणून पडझड झालेला तलाव व शहरातील ऐतिहासिक प्रवेशद्वाराची दुरुस्ती नगरपरिषदेने तत्काळ करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत, शहराध्यक्ष चमन बागवान, किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष डॉ. संतोष होगले, जिल्हा सरचिटणीस जकिर काझी, काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, सरचिटणीस निवास शेळके, राहुल वीर, सचिव महादेव लोंढे, शहर उपाध्यक्ष तुषार चिंचकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.