इंदापूर शहरातील खुळे चौक येथील प्रस्तावित सुशोभीकरणाची फेररचना करा – स्वप्नील सावंत
संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे केली मागणी

इंदापूर शहरातील खुळे चौक येथील प्रस्तावित सुशोभीकरणाची फेररचना करा – स्वप्नील सावंत
संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे केली मागणी
इंदापूर : प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून इंदापूर शहरातील खुळे चौकामध्ये प्रस्थापित असणाऱ्या सुशोभीकरणाच्या कामाची रचना चुकीच्या पद्धतीने असल्याने सदरील कामाची फेररचना करावी अशी मागणी इंदापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी संबधीत विभागाकडे केली आहे.
पुणे बाजूच्या रोड कडून येणाऱ्या वाहनांना विद्या प्रतिष्ठानकडे जाण्यासाठी योग्य पद्धतीचे वळण नसल्याने येणाऱ्या काळात त्या ठिकाणी मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागेल तसेच सध्या त्या ठिकाणी असणाऱ्या गोंण्यांमुळे तिथे अपघात होत आहेत.त्यामुळे सदरील बाबींची त्वरित नोंद घेऊन सदरच्या गोण्या ताबडतोब हटवून खुळे चौकातील प्रस्तापित सुशोभीकरणाची योग्य ती रचना करावी अशा मागण्या सावंत यांनी केल्या असून याबाबतचे लेखी निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री.साळुंखे व इंदापूर नगरपरिषेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांकडे देण्यात आले आहे.
यावेळी काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष चमन बागवान,डॉ.संतोष होगले,जाकीर काझी,मिलिंद साबळे,महादेव लोंढे,संदीप शिंदे,आकाश पवार,युवराज गायकवाड,सुफीयांन जमादार,सचिन गायकवाड इत्यादी उपस्थित होते.