इंदापूर शहरातील शिवशंभो प्रतिष्ठान च्या युवकांचा नावीन्यपूर्ण उपक्रम.
गल्लोगल्ली फिरून गणेश मूर्ती संकलित करण्याचा कौतुकास्पद उपक्रम.
इंदापूर शहरातील शिवशंभो प्रतिष्ठान च्या युवकांचा नावीन्यपूर्ण उपक्रम.
गल्लोगल्ली फिरून गणेश मूर्ती संकलित करण्याचा कौतुकास्पद उपक्रम.
इंदापूर:प्रतिनिधी
कोरोनाचे महाभयंकर संकट दिवसेंदिवस वाढतच असताना इंदापूर शहरामध्ये सुद्धा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे, कोरोनाच्या काळात गणेश विसर्जनासाठी घरातून बाहेर पडणे हे सुद्धा मोठे संकट होऊ शकते ही गोष्ट इंदापूर शहरातील युवकांच्या लक्षात आली.
व त्यांनी या पाश्र्वभूमीवर हा उपक्रम राबवला.आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जनासाठी घरातून बाहेर न पडता आम्हाला कॉल करा आम्ही घरी येऊन श्रींची मूर्ती नेऊन पारंपरिक पद्धतीने ती विसर्जित करू हा उपक्रम जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपट पवार यांच्या मार्गदर्शनखाली इंदापूर शहरात राबवला गेला. शहरातूनही या उपक्रमास चांगला प्रतिसाद देखील मिळाला या उपक्रमाचे इंदापूर करांनी कौतुकही केले.
इंदापूर शहरामधील नागरिकांची गणेश विसर्जनासाठी गैरसोय होऊ नये व इंदापूर मध्ये विसर्जनासाठी बऱ्याच लोकांना जवळपास कोणताही पर्याय उपलब्ध नाही ही बाब विचारात घेऊन इंदापूर शहरातील सर्व गणेश मूर्ती संकलित करून त्यांना पारंपरिक पद्धतीने विसर्जित करण्याचा उपक्रम शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभम पवार व त्यांच्या सहकारी मित्रांनी राबविला.शिवशंभो प्रतिष्ठान व त्यांचे सर्वच कार्यकर्ते नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक सर्वच स्थरातून होत आहे.