इंदापूर शहरात काँग्रेस पक्षाकडून खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा
इंदापूर शहरासह तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन

इंदापूर शहरात काँग्रेस पक्षाकडून खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा
इंदापूर शहरासह तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन
इंदापूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांचा ५१ वा वाढदिवस इंदापूर काँग्रेस पक्षाच्या वतीने संकल्प दिन म्हणून साजरा होत असून शनिवारी ( दि.१९ ) इंदापूर शहरासह तालुक्यात विविध विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रसंगी बोलताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत म्हणाले की, खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदापूर तालुका काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना मास्कचे वाटप करत असून जे नागरिक मास्क वापरतच नाहीत अशांना मास्कचे महत्व सांगत आहोत.येणाऱ्या तिसऱ्या लाटे पासून वाचायचे असेल तर मास्क वापरणे अत्यंत महत्वाचे आहे.त्यामुळेच आम्ही पक्षाच्या वतीने जनजागृती मोहीम चालू केली आहे.तसेच दिवसभर वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
यावेळी जिल्हा सरचिटणीस रमजान बागवान,महिला तालुकाध्यक्षा सीमा कल्याणकर, शहराध्यक्ष चमनभाई बागवान,जकीरभाई काझी,इंदापूर तालुका सचिव महादेव लोंढे,युवकचे तालुका सरचिटणीस मिलिंद साबळे,श्रीनिवास शेळके,भगवान पासगे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या चुकीच्या व जनहित विरोधी धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था पुर्णपणे मोडकडीस निघाल्याने सर्व पातळीवर हे शासन अपयशी ठरल्याने याचा निषेध व्यक्त करत काँग्रेसतर्फे खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.