शैक्षणिक

कमलनयन बजाज महाविद्यालय मध्ये आदर्श माता पिता व वीरमाता पिता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

मान्यवरांनी व पुरस्कार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले.

कमलनयन बजाज महाविद्यालय मध्ये आदर्श माता पिता व वीरमाता पिता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

मान्यवरांनी व पुरस्कार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले.

बारामती वार्तापत्र

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालय बारामती, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नव क्रांती सेवाभावी संस्था बारामती, यांच्या संयुक्त विध्यमाने १४ फेब्रुवारी रोजी माता पिता व वीरमाता पिता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी धनंजय जमदार, अध्यक्ष बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशन, निलेश काटे, सरचिटणीस राष्ट्रीय युवक कॉंग्रेस सातारा, रमाकांत गायकवाड, माजी विभाग नियंत्रण रा. प. पुणे प्रकाश तांबडे, सचिव मानव सेवा सुरक्षा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य, रविकुमार गोरे आगार व्यवस्थापक एसटी, विनायक गुळवे, माजी गटविकास अधिकारी, शर्मिलाताई नलवडे अध्यक्ष हिरकणी महिला विकास संस्था वृद्धाश्रम सेवा, सुधीर आटोळे अध्यक्ष ज्ञानसागर गुरुकुल, प्राचार्य डॉ. श्री. सुधीर लांडे आदी मान्यवर कार्यक्रम प्रसंगी उपस्तीत होते.

समाजातील उपेक्षित, कष्टकरी व अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्ग काढत समाजासाठी आदर्शवत जीवन जगणाऱ्या समाजातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाचा व त्याच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणे व त्यांचा आत्मविश्वास वाढवणार असल्याचे प्रास्ताविक मध्ये
चक्रपाणी चाचर व रत्ना घोगरदरे यांनी सांगितले.

या कार्यक्रमामध्ये वीर माता:- आरती साबळे, आदर्श माता पिता:- मंदाकिनी कांबळे, प्रमिला कोकणे, रोहिणी रांगोळी, रंजन जाधव, सुमन हदगल, मंगल गद्रे, नंदा सवाने, संगीता कुदळे, कुसुम नाळे, इंदुबाई वाघमारे, आशा काशीद, राणी भोसले, समाज रत्न पुरस्कार:- सुचिता साळवे, मंदाकिनी माने, नामदेव सोलनकर, आदर्श शिक्षिका:- सुवर्णा गुळवे, जीवन भूषण पुरस्कार:- विकास साखळकर, उत्कृष्ट सामाजिक संस्था पुरस्कार:- युवा पर्व फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, उत्कृष्ट न्यूज चॅनल:- मानदेश प्राईम न्यूज, गुणवंत पत्रकार:- नितीन दबडे, आदर्श कवी भूषण पत्रकार:- विठ्ठल जावळे, गुणवंत विद्यार्थी:- कुमार शितोळे, प्रसन्ना चित्रगार, गुणवंत खेळाडू:- तनिष साबळे, स्वरा साबळकर, समृद्धी सावंत, जानवी वीरकर, शंभू सकुंडे, कौस्तुभ भंडलकर, राजमाता जिजाऊ पुरस्कार:- शर्मिला नलवडे, शिक्षण सम्राट पुरस्कार:- डॉ. सागर आटोळे, उत्कृष्ट संघटक:- तपस्वीनी महंत कमलाकर बाईजी उपाध्य, लिलाबाई लासुरकर. अवलिया माता पुरस्कार कोमल कुंदप, शौर्य पुरस्कार:- मोहन चव्हाण, नाना दाडर, विशाल झणझणे, आदर्श नृत्यांगना:- रितूशा झगडे, जीवन गौरव पुरस्कार:- प्रा. मनोज वाबळे, डॉ. रेश्मा भापकर, सतीश काकडे, फिरोज बागवान आदीनां समाजातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी व पुरस्कार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी प्रा. दीपक सोनवणे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नव क्रांती सेवाभावी संस्था बारामतीच्या खजिनदार श्रीमती मंजुश्री शिंदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!