इंदापूर शहरात कोरोनाचा विळखा वाढला..
शहरात एकाच कुटुंबातील नऊ जण पॉझिटिव्ह.. यात एक वर्षीय बाळाचा समावेश..
चिंताजनक…
इंदापूर शहरात कोरोनाचा विळखा वाढला..
शहरात एकाच कुटुंबातील नऊ जण पॉझिटिव्ह..
यात एक वर्षीय बाळाचा समावेश..
इंदापूर :- (प्रतिनिधी) तीन दिवसापूर्वी इंदापूर शहरातील कसबा रामवेस नाका परिसरात आढळून आलेल्या 38 वर्षीय कोरोना पॉझिटिव महिलेच्या संपर्कात आलेल्या 22 व्यक्तीमधील नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने इंदापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
इंदापूर शहरातील रविवार दिनांक 14 रोजी 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नऊ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिवह आल्याने इंदापूर करांच्या चिंता वाढल्या आहेत. तर दुसरीकडे शहरातील मंडई परिसरातील कोरोनाबाधीत रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी शहरात वाढत चाललेली कोरोनाग्रस्ताची संख्यामुळे नागरिकांनी जास्तची खबरदारी घेण गरजेचे असून, महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडले पाहिजे, सद्य स्थितीला इंदापूर तालुक्यात कोरोना ग्रस्तांची एकूण संख्या सतरा वर पोहोचलेली असून यात चार जण बरे झाले आहेत तर अकरा जणांवर उपचार सुरू असून दोघांचा मृत्यू झाला आहे..