इंदापूर शहरात कोरोनाचे पाच नवे रुग्ण तर भिगवण मध्ये एक.
इंदापूर शहरासह तालुक्यातील रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ.
इंदापूर शहरात कोरोनाचे पाच नवे रुग्ण तर भिगवण मध्ये एक.
इंदापूर शहरासह तालुक्यातील रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ.
इंदापूर:-प्रतिनिधी
इंदापूर शहरासह तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज देखील इंदापूर शहरातील बाब्रसवाडा येथील पाच तर भिगवण मधील एक अशा एकूण सहा नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे यांनी दिली असून इंदापूर तालुक्यातील कोरोनाचे सत्र सुरूच आहे.
शासनाने घालून दिलेले नियम व अटींचे तंतोतंत पालन करणे गरजेचे असताना सोशल डिस्टन्सिंगला नागरिक पाळत नसल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. शहरातील बाजारपेठेत व मंडईत विनामास्क काही नागरिक फिरताना दिसत आहेत तर काही जणांचा सोलापूर, पुणे, मुंबई अशा ठिकाणांवरून होणारा प्रवास यामुळे देखील दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.