इंदापूर शहरात दोन तर ग्रामीण मध्ये आठ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ.
तालुक्यात आज एकूण दहा नवे रुग्ण.
इंदापूर शहरात दोन तर ग्रामीण मध्ये आठ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ.
तालुक्यात आज एकूण दहा नवे रुग्ण.
इंदापूर:-प्रतिनिधी
इंदापूर शहरासह तालुक्यातील रुग्णांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत असून काही केल्या थांबायला तयार नाही.
आज (दि.27) जुलै रोजी तालुक्यात तब्बल दहा नव्या रुग्णांची वाढ झाली असून यामध्ये इंदापूर शहरातील कासार पट्टा भागात आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील दोन,लासुर्णे येथील एक,लोणीदेवकर येथील एक तर भिगवण येथील सहा अशा एकूण दहा नव्या रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील एकूण रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर ताण पडत असून लोकांमध्ये चिंताजनक वातावरण पहावयास मिळत आहे.