
इंदापूर शहरात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
लोकराजाला केले अभिवादन
इंदापूर : प्रतिनिधी
थोर समाज सुधारक, प्राथमिक शिक्षण, जातिभेद निवारण, अस्पृश्यता निवारण सुधारणांचे पुरस्कर्ते आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४७ वी जयंती कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून इंदापूर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रसंगी मा.सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन तर इंदापूरच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा अंकिता शहा व इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले.
दरम्यान बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की,शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत.सामाजिक परिवर्तनात शाहू राजांचे योगदान खूप मोठे आहे.त्याचमुळे आपल्याला चांगले दिवस मिळाले आहेत.
नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की,शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण देऊन वैभव प्राप्त करून दिले.शाहू महाराज हे समस्त बहुजनांचे आराध्य दैवत आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे म्हणाले की,राजर्षी शाहू महाराज यांचे बहुजन समाजासाठीचे असणारे उपकार भुतो न भविष्य न फिटण्यासारखे आहेत.त्यामुळे देशभरात महाराजांची जयंती घराघरात साजरी व्हावी व त्यांचे विचार आत्मसात करावेत.
यावेळी जयंती उत्सव कमिटीचे मा.अध्यक्ष उत्तम गायकवाड,उपनगराध्यक्ष धनंजय पाटील,प्रा.कृष्णा ताटे,नगरसेवक कैलास कदम,शकील सय्यद,आप्पा माने,शेखर पाटील,हमीद आत्तार,सचिन जामदार,ललेंद्र शिंदे,विजय वैराट, नागेश शिंदे,सचिन पलंगे,रोहित शिंदे,अभिजित अवघडे, नितीन शिंदे,सचिन गायकवाड, सचिन जामदार,संदीप चव्हाण व अन्य उपस्थित होते.आभार प्रदर्शन प्रवीण राऊत यांनी केले.