इंदापूर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी तानाजी भोंग तर कार्याध्यक्षपदी चमनभाई बागवान यांची निवड.
इंदापूर काँग्रेस पार्टीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड...
इंदापूर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी तानाजी भोंग तर कार्याध्यक्षपदी चमनभाई बागवान यांची निवड…
इंदापूर काँग्रेस पार्टीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड…
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
आज दि.७ रोजी इंदापूर स्वामीराज हॉटेल येथे पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
इंदापुर शहराध्यक्षपदी तानाजीराव भोंग, शहर उपाध्यक्षपदी तुषार चिंचकर,इंदापुर शहर कार्याध्यक्षपदी चमनभाई बागवान,जिल्हा सरचिटणीसपदी जकीरभाई काझी, इंदापुर तालुका उपाध्यक्षपदी भिबीशन लोखंडे,तालुका सरचिटणीसपदी नितीन राऊत, इंदापूर शहर सहसचिवपदी सुरेश लोखंडे, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी प्रमोद खबाले,इंदापुर तालुका विद्यार्थी कॉग्रेस अध्यक्षपदी शंभूराज साळुंखे यांची निवड करण्यात आली.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत पुणे जिल्हा युवक सरचिटणीस जावेद शेख व वीरधवल गाडे हे उपस्थित होते.
यांची निवड झाल्याची माहिती नूतन अध्यक्ष तानाजी भोंग यांनी दिली.