इंदापूर

इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा…

समितीच्या नेत्यांनी नगरपालिकेला दिला 20 दिवसांचा अल्टीमेटम... 20 दिवसात मागण्या मान्य नाही झाल्या तर नगरपालिके समोर करणार आंदोलन.

इंदापुर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने इंदापूर नगरपालिकेला यांच्या विविध मागण्यांसाठी वीस दिवसांचा अल्टिमेटम दिला असून या मागण्या जर मान्य केल्या नाहीत ही तर इंदापूर नगरपालिकेचे समोर धरणे आंदोलन करून जन आंदोलन उभा करण्याचा इशारा दिला आहे.

समितीच्यावतीने आज इंदापूर नगरपालिकेला व संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहेत, यात म्हटले आहे की , इंदापुर शहरातील नागरीकाच्या प्रश्नांसंबधी व अडचणी संबधी आम्ही आपणाकडे या पुर्वी दि. 19/12/2017 रोजी धरणे आंदोलन केले होते हे धरणे आंदोलन घरपट्टी वाढ विरोधी व 24% व्याज आकारणी विरोधी होते. त्या अनुशंघाने दि 20/12/2017 रोजी मा.मुख्याधिकारी सो. यांनी संघर्ष समितीस दिलेले पत्र या अंदोलनाच्या वेळी आपण आमच्या मागण्या मान्य करुन लेखी पत्र दिले होते.

परंतु नगरपालीकेने आम्हाला दिलेल्या लेखी आश्वासनाची कोणतेही पुर्तता केली नाही. इंदापुर नगरपालिकेने जनतेच्या भावनेचा विचार केला नाही.

तरी आम्ही आपणास विनंती करतो की, आम्हाला त्या वेळी जे आश्वासन दिले होते त्याची तातडीने पुर्तता करुन दिलेल्या पत्रा प्रमाणे त्वरीत कारवाही करावी. आम्ही त्या वेळेस केलेल्या मागणीवर ठाम आहोत, या शिवाय कोरोनाच्या परिस्थित जनतेची जी कोंडी झाली आहे त्या मध्ये लोक बेहाल आहेत.

म्हणुन आम्ही खालील प्रमाणी मागण्या करीत आहोत. आमच्या मागण्यावरती 20 दिवसाच्या आत जर कार्यवाही केली नाही तर आम्ही इंदापुर नगरपालिकेसमोर समोर धरणे अंदोलन करणार आहोत.

खालील मागण्याचा विचार करावा हि विनंती.

1) 2017-2018 पासुन घरपट्टीवरती दर साल दर शेकडा 24% दराने व्याज आकारले जात आहे. 2017-2018 पासुन ते आज पर्यंत चे व्याज आकारणी रद्द करावी. व यापुढे ही व्याज आकरणी करु नये.

2) इंदापुर शहरातील बांधकामांना लावले शास्ती जी घरपट्टी वसुलीची मुळ रक्कम आधीक दुप्पटची रक्कम वसुल केली जाते. ती सदर ची शास्ती व दंड रद्द करुन बांधकामे नियमित करावेत.

3) इंदापुर नगरपरिषद मालकीचे दुकाने भाडयाने आहेत त्यावरील कोरोनाच्या कालावधीत भाडे, घरपट्टी त्यावरील व्याज, दंडव्याज, रद्द करुन वसुल रजिस्टर वरुन मागणी कमी करावे.

4) करोनाच्या कालावधीतील घरपट्टी, पाणीपट्टी , भाडे, व्याज, दंड पुर्णपणे माफ करावे.

5) घरपट्टी वसुलीसाठी नगरपालिकेचे कर्मचारी घरोघर फिरुन नागरीकांना घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी तगादा लावत आहेत. ते आजची कोरोनाची परिस्थिती लक्ष्यात घेऊन ते थांबवावे.

6) इंदापुर नगरपरिषद ची बखळ जागेवर आकारणी करीत आहे बखळ जागेला इंदापुर नगरपरिषद कोणत्याही सेवा देत नसल्याने तसेच बखल जागा मालकाला सदर जागेपासुन कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नसल्यामुळे सदर जागेवरील घरपट्टी रद्द करावी.

7) ज्या करदात्याकडे घरपट्टी, पाणीपट्टी थकली असेल, त्यांना कोरोनाच्या काळातील आर्थीक परिस्थिती लक्ष्यात घेऊन ज्या करदात्यांना नगरपालिकेचे दाखले उतारे हवे आहेत. ते त्यांना थकबाकीचे कारण न दाखवता देण्यात यावे. जर संगनकीय पध्दतीमुळे ते दाखले देणे शक्य नसेल तर हस्तलिखीत पध्दतीने ते दाखले देण्यात यावे.

8) इंदापुर नगरपालिकेची ज्या करदात्याकडे घरपट्टी थकली आहे त्यांची थकबाकी घरपट्टी लॉकडाऊन च्या काळानंतर हप्ते देऊन सवलतीने वसुल करण्यात यावी.

9) इंदापुर नगरपालिका पुर्वी वृक्ष कर 0.5% घेत होती ती आता 1% घेत आहे, सदरची आकारणी विहीत पध्दतीची औलंबण न करता आकरली आहे त्याऐवजी नगरपालिकेने 0.5% पुर्वी च्या दराने आकारण्यात यावी.

10) इंदापुर नगरपालिका मालमत्ता कर अपील समितीकडे मालमत्ता धारकांची अनेक अपीले प्रलंबीत आहेत,(अंदाजे 1200) त्याचा निपटारा करुन नागरीकांना दिलासा द्यावा.

11) माजी सैनिकांची घरपट्टी शासनाच्या जी आर प्रमाणे माफ करण्यात यावी.

12) इंदापुर शहराचे वाढीव हद्द झाले पासुन वाढीव हद्दीतील शेतजमीनेचे गुंठ्याप्रमाणे विक्री झाली, वाढीव हद्द होऊन साधारण 28 वर्षापासुन वाढीव हद्दीतील लोकाकडुन नगरपरिषद संकलीक कर गोळा करते, परंतु नागरिकांना बिगर शेती (NA) व त्याचा क.ज.प. करताना सिटी. सर्वेतील नियमांनमुळे अडचणी येत आहेत, म्हणुन नगरपालिकेने वाढीव हद्दीतील भोगावाटदार, मालक मालमत्तेचे सिटी. सर्वेवर रेखांकन करुन त्याचे स्वतंत्र मालकी पत्र, नकाशे, लांबी-रुंदी श्रेत्रफळासह सिटी. सर्वे उतारा (Property Card) तयार करुन द्यावे.

13) इंदापुर नगरपालिका मुळ व वाढीव हद्दीत शासकीय व निमशासकीय जागेवरती रहीवास करणाऱ्या मालमत्तांचे सर्वेक्षण करुन शासकीय नियमाप्रमाणे भोगावटदार, वहीवाटदार यांच्या घरांचा सिटी. सर्वे करावा. व त्यांची मलमत्ता कार्ड (Property Card) , नकाशे याचे भुमापणन करुन भोगावटदार, वहीवाटदार यांच्या नावावर करावे.

वरील मागण्या ह्या इंदापुरकर जनतेच्या हिताच्या असुन आपण गेल्या 2017 पासुन लेखी अश्वासन देऊन त्यावर कोणतेही कार्यवाही केली नाही तरी वरील मागण्याच्या सहानभुतीपुर्वक नगरपालिकेने विचार करुन आपल्या परीने जे करणे शक्य आहे ते लवकरात लवकर 20 दिवसाच्या आत सदर मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही सर्वजन आपल्या नगरपालिके समोर धरणे अंदोलन करणार आहोत त्याच बरोबर जनअंदोलन उभा करणार आहोत तरी अपण सदर बाबींवर लवकरात लवकर कार्यवाही करावी अशा स्वरूपाचे निवेदन इंदापूर नागरी संघर्ष समितीने दिलेले आहे,यावेळी माजी नगराध्यक्षा अलका ताटे, गफूर सय्यद, रमेश शिंदे, शिवाजी मखरे, बाळासाहेब सरोवदे, हनुमंत कांबळे, ॲड.अशितोष भोसले, माऊली नाचण, अंकुश काळे जकिर काझी, जयंत नायकुडे, प्रा.कृष्णा ताटे, अमोल खराडे, बिभीषण लोखंडे, तानाजी भोंग.. आदि मान्यवर उपस्थित होते, नगरपालिका प्रशासन त्यांच्या या मागण्या मान्य करणार का? याकडे संपूर्ण इंदापूर करांचे लक्ष लागून राहीले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram