इंदापूर सायकल क्लबच्या सदस्यांची सायकल प्रवासातून पर्यावरण जनजागृती
तब्बल पाचशे किलो मीटर केली सायकलस्वारी

इंदापूर सायकल क्लबच्या सदस्यांची सायकल प्रवासातून पर्यावरण जनजागृती
तब्बल पाचशे किलो मीटर केली सायकलस्वारी
इंदापूर : प्रतिनिधी
दैनंदिन जीवन जगताना आणि वेगाने प्रगती साधताना पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता पर्यावरण संतुलन राखणे काळाची गरज बनली आहे.नेमकी हीच बाब लक्षात घेऊन इंदापूर सायकल क्लबच्या सदस्यांनी तब्बल पाचशे किलोमीटर सायकल प्रवासातून पर्यावरण जनजागृती केली आहे.
इंदापूर सायकल क्लबचे सदस्य ह.भ.प दशरथ भोंग,रमेश शिंदे व विष्णू खरात यांनी इंदापूर ते आळंदी,देहू करत परत पालखी मार्गाने पंढरपूर पर्यंत सायकल प्रवास करत फलकांच्या माध्यमातून कोरोना व पर्यावरणासंदर्भात संदेश देत सायकल वारी पूर्ण केली.त्यानिमित्ताने इंदापूर सायकल क्लबच्या तीनही सदस्यांचा सत्कार क्लबचे अध्यक्ष सुनील मोहिते यांनी केला.तसेच पुढील सामाजिक जनजागृतीच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी दशरथ भोंग,रमेश शिंदे यांनी सायकल प्रवासाचे अनुभव कथन केले.तसेच क्लबकडून मिळत असलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभार व्यक्त केले.यावेळी सायकल क्लबचे सदस्य प्रशांत शिताप,अवधूत पाटील,डॉ.पंकज गोरे,अस्लम शेख,विनायक वाघमारे, संजय शिंदे,ज्ञानदेव डोंगरे,सिद्धार्थ वाघमारे, उदय शहा,भगवान घोगरे,उमेश राऊत,शशिकांत सावळकर, समीर विंचू,श्री गाणबोटे, सुनीता राऊत,सुनीता कदम,श्वेता राऊत इत्यादी उपस्थित होते.