इतिहासात प्रथमच पालखी च्या पादुका आकाशमार्गे पंढरपूरला जाणार
वारकरी व प्रशासन यांचे एकमत

इतिहासात प्रथमच पालखी च्या पादुका आकाशमार्गे पंढरपूरला जाणार
वारकरी व प्रशासन यांचे एकमत ,याबाबत दशमीला निर्णय स्पष्ट होईल.
२०२० साली प्रथमच पालखी मधील पादुका पंढरपूरला दर्शना साठी आकाश मार्गे जाणार आहे. या बाबत सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे कोरोना संकटामुळे यंदाचा पायी पालखी वारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे.
दिंड्यांना ही परवानगी नाकारली आहे. वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झालं असून आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने पंढरपूरला देवभेटीस जाणार आहेत.
आज शुक्रवार दिनांक २९ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात होते. दरम्यान त्यांच्या उपस्थितीमध्ये वारीबाबत बैठक झाली.
या बैठकीत पायी वारी सोहळ्याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. त्यानंतर आळंदी आणि देहूवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात येणार असल्याचे
सांगण्यात आले. याबाबत दशमीला निर्णय स्पष्ट होईल.