स्थानिक

इयत्ता दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली.

इयत्ता दहावीच्या परीक्षेत बारामती केंद्राचा 98.39 टक्के निकाल जाहीर झाला.

इयत्ता दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली.

इयत्ता दहावीच्या परीक्षेत बारामती केंद्राचा 98.39 टक्के निकाल जाहीर झाला.

बारामती वार्तापत्र

बहुतेक सर्वच शाळांनी यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे. यंदाच्या निकालात बारामती केंद्रात मुलींनी बाजी मारली असून, उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक आहे.

इयत्ता दहावीच्या परीक्षेत बारामती केंद्राचा 98.39 टक्के निकाल जाहीर झाला. बहुतेक सर्वच शाळांनी यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे. यंदाच्या निकालात बारामती केंद्रात मुलींनी बाजी मारली असून, उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक आहे.

बारामती केंद्रावर 5955 विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 5859 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालाचे वैशिष्टय म्हणजे केवळ 96 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत. मुलींनी यंदा विक्रमच प्रस्थापित केला असून, अवघ्या 24 मुली अनुत्तीर्ण झाल्या आहेत. 72 मुले अनुत्तीर्ण झाले. बारामती केंद्रावरील 71 शाळांमधील 3139 मुले व 2816 मुलींनी ही परिक्षा दिली. त्यापैकी 3067 मुले, तर 2792 मुली उत्तीर्ण झाल्या. यामध्ये मुलांच्या निकालाची 97.71 टक्केवारी इतकी, तर मुलींच्या निकालाची टक्केवारी 99.15 टक्के इतकी आहे.

बारामती तालुक्यातील मिशन हायस्कूल, नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे, आर. एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट अँड ज्युनिअर कॉलेज, आनंद विद्यालय होळ, विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीर, श्री शिरसाई विद्यालय शिर्सुफळ, श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय भिकोबानगर, न्यू इंग्लिश स्कूल खलाटेवस्ती, लाटे, श्रीमती हौसाबाई पांडुरंग घोरपडे विद्यालय पिंपळी, शारदाबाई पवार विद्या निकेतन शारदानगर, न्यू इंग्लिश स्कूल मेखळी, विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक विद्यालय, वसंतराव पवार विद्यालय देउळगाव रसाळ, श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर, सोमेश्वर विद्यालय आंबी बुद्रुक, न्यू इंग्लिश स्कूल गोजुबावी, खांडेश्वरी माध्यमिक विद्यालय खांडज, माध्यमिक विद्यालय गडदरवाडी खंडोबाचीवाडी, श्री बी. एस. काकडे देशमुख विद्यालय निंबूत, श्री भैरवनाथ विद्यालय को-हाळे खुर्द, उर्दू माध्यमिक विद्यालय बारामती, श्री

भैरवनाथ विद्यालय मेडद, उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळा वाघळवाडी, बाजीराव गावडे पाटील विद्यालय गुनवडी, विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल बारामती, कवी मोरोपंत शिक्षण संस्था माध्यमिक बारामती, विजय बाल विकास मंदीर माध्यमिक विद्यालय बांदलवाडी, विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदीर, पिंपळी, श्री सिध्देश्वर पब्लिक स्कूल को-हाळे बुद्रुक, राजे प्रतिष्ठान न्यू इंग्लिश स्कूल खंडूखैरेवाडी, अभिनव इंटरनॅशनल स्कूल प्रगतीनगर, सोमेश्वर पब्लिक स्कूल, शारदानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, शारदाबाई पवार विद्या निकेतन डे स्कूल, संत सावतामाळी प्रायमरी स्कूल, सरस्वती माध्यमिक विद्यालय, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल या तब्बल 38 शाळांचा निकाल शंभर टक्के जाहिर झाला आहे.

इतर शाळांच्या निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे- म.ए.सो. विद्यालय- 99.22, एस.एस.एम. विद्यालय माळेगाव- 93.84, श्री छत्रपती शाहू हायस्कूल- 97.75, स्वातंत्र्य विद्या मंदीर, वडगाव निंबाळकर- 96.96, वसतिगृह विद्यालय, काऱ्हाटी- 95.09, श्री शहाजी हायस्कूल सुपे- 96.75, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय सांगवी- 97.36, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टी- 97.89, मयूरेश्वर विद्यालय मोरगाव- 96.74, न्यू इंग्लिश स्कूल डोर्लेवाडी- 96.83, न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी- 99.25, श्री सिध्देश्वर हायस्कूल कोऱ्हाळे बुद्रुक- 96.19, न्यू इंग्लिश स्कूल कारखेल- 98.03, सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर- 96.73, शारदाबाई पवार विद्यालय शिवनगर- 98.71, न्यू इंग्लिश स्कूल, लोणी भापकर- 94.89, सोमेश्वर विद्यालय अंजनगाव- 98.24, वाघेश्वरी विद्यालय नीरावागज- 98.55, न्यू इंग्लिश स्कूल चोपडज- 97.10, श्री छत्रपती हायस्कूल, सोनगाव- 98.21, कै. जिजाबा गावडे विद्यालय पारवडी- 98.97, माध्यमिक विद्यालय, करंजे, सोरटेवाडी- 96.38, धों. आ. सातव माध्यमिक विद्यालय- 98.27, सोमेश्वर विद्यालय, मुढाळे- 97.22, श्री छत्रपती हायस्कूल काटेवाडी- 98.83, न्यू इंग्लिश स्कूल, नारोळी- 96.15, श्री भैरवनाथ विद्यालय बाबुर्डी- 94.73, न्यू इंग्लिश स्कूल ढाकाळे- 90.62, श्री छत्रपती हायस्कूल निंबोडी- 96.55, कै. अनंतराव पवार माध्यमिक विद्यालय पळशी- 91.66, जनहित प्रतिष्ठानचे विद्यालय- 96, इंग्लिश मिडीयम स्कूल माळेगाव- 98.52.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!