इस्त्री साठी कपडे दिले,,, मात्र खिशात होते सात हजार रुपये, पहा लॉन्ड्रीवाल्याने काय केले.
दुसऱ्यांदा घडला प्रकार
इस्त्री साठी कपडे दिले,,, मात्र खिशात होते सात हजार रुपये, पहा लॉन्ड्रीवाल्याने काय केले.
दुसऱ्यांदा घडला प्रकार
बारामती वार्तापत्र
प्रत्येकाला हल्ली प्रामाणिकपणे वागण्याची सवय असतेच असे नाही. मात्र समाजात असे बोटावर मोजता येणारे लोक असतात जे आपल्या रोजीरोटीसाठी प्रामाणिकपणे मेहनत करून, कष्ट करून आपला व्यवसाय चालवत असतात.
बारामतीतील असेच एक व्यवसायिक लॉन्ड्री चालक अजित लक्ष्मण पवार हे आहेत. अजित पवार हे कसब्यातील शिवाजी उद्यानासमोर लॉन्ड्री चे दुकान चालवतात. पाच दिवसापूर्वी एक महिला गृहिणी इस्त्रीच्या कपड्यांची पिशवी घेऊन आली. लॉन्ड्री चालकाच्या दुकानातही महिला होती. दोघींची ओळख नव्हती. पिशवीवर नाव असेल म्हणून लॉन्ड्री चालकांनी कुठलीही ओळख न घेता कपड्यांची पिशवी ठेवून घेतली. मात्र आज सकाळी त्या पिशवीतील कपडे इस्त्री करण्यासाठी घेतली असता पॅन्टच्या खिशामध्ये सात हजार रुपये मिळून आले.लॉन्ड्री चालक अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी ला इस्त्रीसाठी पिशवी कोणी दिली याविषयी विचारले असता पिशवीवर नाव पाहिले तर पिशवीवर नावही नव्हते. मात्र अशा प्रकारची पिशवी सातव नावाचे गृहस्थ प्रत्येक वेळी इस्त्रीसाठी आणतात एवढाच काय तो सुगावा लागला. मग लॉन्ड्री चालक पवार यांनी प्रकाश सातव यांच्याकडे चौकशी केल्यावर ही कपडे संजय सातव यांची आहेत असे समजले.
मग संजय सातव यांच्याशी संपर्क करून कपड्या विषयी खात्री पटल्यावर खिशात सापडलेले सात हजार रुपये लॉन्ड्री चालकांनी परत दिले. त्यावेळी संजय सातव यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.या पैशाविषयी त्यांनाही कल्पना नव्हती. मात्र लॉन्ड्री चालकाचा प्रामाणिकपणा पाहून संजय सातव भारावून गेले व त्यांनी लॉन्ड्री चालक पवार यांचे आभार व्यक्त केले.
दुसऱ्यांदा घडलेला प्रकार
2009 साली निरा येथील एक ग्राहक लॉन्ड्री चालक पवार यांच्या दुकानात कपडे इस्त्री करण्यासाठी येत होते. त्यांच्या पॅन्टच्या खिशात 70 हजार रुपये किमतीचा एक सोन्याचा दागिना होता. मात्र कोणत्याही हव्यासाला बळी न पडता पवार यांनी तो सोन्याचा दागिना निरा येथील त्या ग्राहकाला परत केला.एकूणच या सर्व प्रकारामुळे लॉन्ड्री चालक पवार यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संपूर्ण बारामतीकर कौतुक करत आहेत.