ईद ए मिलाद सामाजिक सलोखा ठेवून साजरा करावा : पो.नि तयूब मुजावर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन
ईद ए मिलाद सामाजिक सलोखा ठेवून साजरा करावा : पो.नि तयूब मुजावर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन
इंदापूर : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद ए मिलाद सह भविष्यात येणारे सण शांततेत साजरे करावेत, पोलिसांचे सहकार्य सर्वांना राहील. मात्र चुकीच्या कोणत्याही गोष्टींना पाठिंबा दिला जाणार नाही. तेव्हा ईद ए मिलाद सामाजिक सलोखा ठेवून साजरा करावा, असे आवाहन इंदापूर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी केले आहे.
जुलूस कुठेही काढू नये.सणासुदीच्या गृहउपयोगी साहित्यांचे वाटप तसेच रक्तदान शिबिरा सारखे सामाजिक उपक्रम राबवून सण शांततापूर्ण वातावरणात साजरा करावा.अशा सूचना मुजावर यांनी आढावा बैठकी दरम्यान केल्या.तसेच उपस्थितांसह मुस्लिम बांधवांना ईद ए मिलाद च्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आझाद सय्यद,शेरखान पठाण,चमनभाई बागवान,जकीरभाई काझी,इब्राहिम शेख,इम्रान शेख यांसह अन्य मुस्लिम बांधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे,पो.ना एल.पी साळवे,पो.ह पवन भोईटे,पो.कॉ समाधान केसकर व अन्य कर्मचारी उपस्थित होते.