इंदापूर

ईव्हीएमच्या माध्यमातून मतदारांना मूर्ख बनवलं जातंय – प्रा.जोगेंद्र कवाडे

निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार यांचे साटेलोटे असल्याचा आरोप

ईव्हीएमच्या माध्यमातून मतदारांना मूर्ख बनवलं जातंय – प्रा.जोगेंद्र कवाडे

निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार यांचे साटेलोटे असल्याचा आरोप

इंदापूर : प्रतिनिधी

कोणतेही इलेक्ट्रिक डिवाईस हे रीमोट कंन्ट्रोलने वापरता येते.ईव्हीएम मशीन ही देखील त्याचाच एक भाग आहे.इतक्या वर्षापर्यंत देशात बॅलेट पेपरवर निवडणूका होत होत्या.परंतु आता ईव्हीएमच्या रुपाने बुलेटचा वापर करुन या देशातील सर्वसामान्य मतदारांना झुलवत ठेवत मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी इंदापूर येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे,महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडीचे अध्यक्ष संजय सोनवणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रा.कवाडे म्हणाले की,ज्या देशामध्ये ईव्हीएम चा शोध लागाला त्या देशाने सुध्दा ईव्हीएम बाद केले.मगं भारताला काय अडचण आहे. आम्हीही लोकसभेच्या निवडणुका लढलो आणि बॅलेट पेपरवर निवडून आलो.ईव्हीएम असते तर कदाचित निवडून आलो नसतो.

निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार यांचे साटेलोटे

निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार यांचे साटेलोटे आहे.त्यामुळे बॅलेट पेपरच्या ऐवजी ईव्हीएमनेच निवडणुका व्हाव्यात,मतदान व्हावं अशा प्रकारची तरतूद केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.अमेरिका सारखा देश ईव्हीएम ला नाकारून बॅलेट पेपर वर निवडणूका घेतो कारण त्या जास्त विश्वसनीय आहेत. मगं भारतात मोठी यंत्रणा असताना का अशक्य आहे असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रभाग पद्धती नको तर वाॅर्ड पध्दती हवी

यावेळी बोलताना प्रा.जोगेंद्र कवाडे म्हणाले की, मुंबई महानगरपालिका वगळता राज्यात सर्वत्र प्रभाग पद्धतीने महानगरपालिका व नगरपरिषद निवडणुका घेण्याचा निर्णय झाला आहे.त्याला आमचा विरोध असून प्रभाग पध्दती नको तर एक वाँर्ड एक उमेदवार पध्दती अवलंबली पाहिजे अशी आमची पहिल्यापासून मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

पीपल्स रिपब्लिकन पक्ष आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे झाली परंतु सरकारमधील असणाऱ्या घटक पक्षाला न्याय मिळाला नाही.आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जर एखाद्या पक्षाचा आघाडीसाठी प्रस्ताव आल्यास व आमचा अझेंडा त्यांना मान्य असल्यास आम्ही गांभीर्यपूर्वक विचार करु. राजकारणात कोण कोणाचा शत्रू व कायमचा मित्र ही नसतो.पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा घटक पक्ष म्हणून योग्य सन्मान नाही झाला तर निश्चित वेगळा विचार करावा लागेल असे म्हणतं त्यांनी एकप्रकारे महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.

कोणी मदत करों अथवा ना करों ईव्हीएम हमारें साथ हैं !

उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत भाजप नेते अमित शहा म्हणाले होते की,आमच्या ३०० पेक्षा अधिक जागा निवडून येतील आणि आल्या देखील.देशात ईव्हीएम च्या माध्यमातून निवडणूका होत असताना अमित शहा असा विश्वास कशाच्या आधारे व्यक्त करतात असा प्रश्न प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित केला.पुढे बोलताना ते म्हणाले की,कारण त्यांना माहीत होते की, ईव्हीएम च्या मदतीने आम्ही ३०० पेक्षा जास्त जागा निवडून आणू कोणी मदत करों अथवा ना करों ईव्हीएम हमारें साथ हैं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram