उंडवडी येथे दारुचा ट्रक पलटला ; विखुरलेल्या बाटल्या बघून शौकिनांची तोबा गर्दी
अपघातात ड्रायव्हर व किनर बचावले
उंडवडी येथे दारुचा ट्रक पलटला ; विखुरलेल्या बाटल्या बघून शौकिनांची तोबा गर्दी
अपघातात ड्रायव्हर व किनर बचावले
बारामती वार्तापत्र
बारामती पाटस महामार्गावर उंडवडी कडेपठार येथे शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दारुच्या बॉक्सने भरलेला ट्रक वाहन चालकाचे नियंञण सुटल्याने पलटी झाला. ट्रकमध्ये ६५ लाख रुपये किमतीचे ९५० बॉक्स भरले होते. अशी माहिती चालक निलेश गोसावी व किनर अंकुश बेंद्रे (रा. बारामती) यांनी दिली. अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
मात्र दारूच्या ट्रक पलटी झाला आहे. त्याची माहिती काही वेळातच सगळीकडे पसरली. आणि नागरिकांनी पिशव्या घेऊन येऊन दारूचे बाटल्या पळवल्या नेल्या यात महिलांसह मुलींनीही दारु पळुन नेल्या परंतु ड्रायव्हर व किनर यांना कोनीही गाडीतुन बाहेर काढण्यासाठी मदत केली नसल्यामुळे दारु पुडे माणुसकी कमजोर पडल्याचे चित्र पहायला मिळाले. सकाळ पर्यंत लोकांनी दारु लुटण्यावर बर दिलता परंतु बारामती ग्रामीणचे पोलीस घटणास्थळी दाखल होताच लोकांनी दारुच्या बाटल्या सोडुन पळ काढला.
बातमी चौकट :
दारू घेऊन जाण्यात महिलांचाही सहभाग
गाडी ड्रायव्हर निलेश गोसावी व क्लिनर अंकुश बेंद्रे यांनी लोकांनी दारु घेऊन जाऊ नये. यासाठी प्रयत्न केल्यावर ड्रायव्हर मारहाण करण्यात आली. तसेच नागरिकांनी गाडीची ताडपत्री सतुर या हत्याराने फाडून पोतीच्या पोती दारु घेऊन गेले. विशेष म्हणजे यात महिला ही सामील झाल्याची माहिती गाडी चालक यांनी दिली.