उजनीचे सोळा दरवाजे उघडले.
भीमेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
इंदापूर:-प्रतिनिधी
पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणाचे 16 दरवाजे 0.18 मीटरने उचलून भीमा नदीत 15 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असून, नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.