उजनी धरण क्षेत्रातील मच्छिमारांसाठी प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन ; श्रीराज भरणे राहणार उपस्थित
प्रशिक्षणाचा मच्छिमारांना होणार फायदा

उजनी धरण क्षेत्रातील मच्छिमारांसाठी प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन ; श्रीराज भरणे राहणार उपस्थित
प्रशिक्षणाचा मच्छिमारांना होणार फायदा
इंदापूर : प्रतिनिधी
उजनी धरण क्षेत्रातील मच्छिमारांसाठी प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन दि.२७ रोजी मौजे शहा (महादेवनगर) ता.इंदापूर या ठिकाणी करण्यात आले असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे हे उपस्थित राहणार आहेत.
या प्रशिक्षण मेळाव्यात उजनी धरण क्षेत्रातील मत्स्यव्यवसाय, नौकानयन, मासेमारी पध्दत, नौका इंजिनाची देखभाल व अन्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.उजनी पाणलोट क्षेत्रातील अगोती, आजोती,सुगाव,पडस्थळ, कांदलगाव,हिंगणगाव,शहा,महादेवनगर या परिसरात मच्छिमारी करणाऱ्यांची संख्या अधिकची असून त्यांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळावा या उद्देशाने परिसरात प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यास मच्छिमारांनी हजर राहून प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले असून सदरील कार्यक्रमास उद्घाटक म्हणून श्रीराज भरणे यांसह जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे,शहाच्या सरपंच पूनम कडवळे, उपसरपंच संतोष पांढरे,दुर्गा कुंभार,दिलीप पाटील,सुनीता निकम उपस्थित राहणार आहेत.