इंदापूर

उजनी पाणलोट क्षेत्रातील लहान माशांची चोरटी मासेमारी करणाऱ्यांवर इंदापूर पोलिसांची कारवाई

गुन्ह्यातील सात आरोपींना अटक

उजनी पाणलोट क्षेत्रातील लहान माशांची चोरटी मासेमारी करणाऱ्यांवर इंदापूर पोलिसांची कारवाई

गुन्ह्यातील सात आरोपींना अटक

इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )

प्रतिबंधीत उजणी पानलोट क्षेत्रातील लहान माशांची अवैद्य पद्धतीने चोरटी मासेमारी करणाऱ्यांवर इंदापूर पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून ०७ आरोपींना अटक करुन आरोपींकडून १०८० कि. ग्रॅम वजनाचे १,०२,२००/- रू. किमंतीचे वेगवेगळया जातींचे लहान आकाराचे सुकवलेली पिल्ले जप्त केली आहेत. सदर आरोपींना इंदापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सातही अटक आरोपींना दिनांक २५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत इंदापूर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक २३/११/२०२० रोजी अकलूज बायपास थेथे एका पिकपमध्ये उजणी पानलोट क्षेत्रात लहान माशांची मासेमारी करून ते सुकवून मासळी बाजारात चढया भावाने विक्रीसाठी घेवून चाललेबाबत इंदापूर पोलीसांना माहीती मिळाली. माहिती मिळालेनंतर पोलीस निरीक्षक सारंगकर यांनी पोलीस नाईक दिपक पालके, पोलीस शिपाई अमित चव्हाण, विशाल चौधर व विक्रमसिंह जाधव यांचे पथक तयार केले व मिळाले माहीतीबाबत खात्री करण्यास पाठविले असता अकलूज बायपास सरस्वतीनगर येथे पिकअप जिप नंबर एम एच ४२ ए क्यु ३०३५ मध्ये एकुण ४८ सुती गोण्यांत वेगवेगळया जातींचे लहान आकाराची सुकवलेली माशांची पिल्ले भरलेली पोती आढळून आली. सदर जिपमधील नारायण आसाराम बनारे यांना सदर माशांबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडविची उत्तरे देवून त्यांचेकडे मासे पकडण्याचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.

पोलीसांनी मिळून आलेली पिकअप मुद्देमालासह पोलीस ठाण्यात आणली, त्यानंतर पाटबंधारे विभाग इंदापूर यांचेशी पत्रव्यवहार केलेनंतर संजय नारायण मेटे, वय ५२ वर्षे, व्यवसाय नोकरी, उपविभागिय अभियांता पळसदेव रा. बारामती, ता. बारामती, जि. पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण आसराम बनारे वय ४३ वर्षे रा. सरस्वतीनगर इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे, रोहीदास दौलु बनारे वय २१ वर्ष रा.सदर,आकाश नारायण बनारे वय २१ वर्षे रा. सरस्वतीनगर ता. इंदापूर जि. पुणे,लक्ष्मण नारायण बनारे, वय २३ वर्षे, रा. सदर, विलास नारायण बनारे, वय १९ वर्षे रा. सदर, विठ्ठल कांतीलाल गव्हाणे वय २६ वर्षे रा. पळसदेव ता. इंदापूर जि. पुणे, बाळासाहेब वसंत चितारे, वय ३८ वर्षे रा. पिंपरी खु।। ता. इंदापूर जि. पुणे, एकनाथ बाळूराव विचारे वय ३२ वर्षे रा. कालठन नंबर २ ता. इंदापूर जि. पुणे यांनी त्यांचेकडे मासे पकडण्याचा पाटबंधारे विभागाकडील कोणताही परवाना नसताना देखील स्व:ताचे आर्थिक फायदयाकरीता उजणी, जलाशयाचे कालठन नंबर २, शिरसोडी, सुगाव, शहा, कांदलगाव, हिंगणगाव गावचे हद्दीतील पात्रातुन पकडले आहेत व ते सुकवून मासळी बाजारात चढया भावाने विकी करण्यासाठी घेवून जाण्याचे तयारीत असताना मिळून आलने त्यांचे विरोधात इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ११४०/२०२० भादंविक. ३७९, ३४ सह पाटबंधारे अधिनियम १९७६ चे कलम ९४ (ब) / १०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सारंगकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिपक पालके हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!