इंदापूर

उजनी पाणी प्रश्न मिटला… बारामतीतल्या आंदोलनाला पुन्हा एकदा यश…??

उजनीतून इंदापूरला पाणी नेण्याचा आदेश रद्द; शासनाने काढला लेखी आदेश

उजनी पाणी प्रश्न मिटला… बारामतीतल्या आंदोलनाला पुन्हा एकदा यश…??

उजनीतून इंदापूरला पाणी नेण्याचा आदेश रद्द; शासनाने काढला लेखी आदेश

बारामती वार्तापत्र

उजनी​ धरणातून इंदापूर तालुक्यासाठी मंजूर केलेले 5 टीएमसी पाण्याचा आदेश आज रद्द करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजीनाथ चिल्ले यांनी हा निर्णय रद्द केला आहे.

पोलिसांनी मज्जाव केल्याने यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. तर याची दखल घेत पाटील यांनी त्वरित हा आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि सुरू असलेले हे आंदोलन स्थगित करण्यात आले

जलसंपदा विभागाचे उपसचिव चिल्ले यांनी २२ एप्रिल रोजी उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील खडकवासला उपसा सिंचन योजनेमध्ये नेण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्याबाबतचे आदेश जारी केले होते. त्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पंढरपूर दौर्यात इंदापूरला उजनीतून ५ टीएमसी पाणी नेण्यास शेटफळ गडी उपसा सिंचन योजनेला शासनाने मंजूरी दिल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर या योजनेच्या कामास सोलापूर जिल्ह्यातील तीव्र विरोध झाला. शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधींनी या निर्णयास विरोध केला.

तेव्हापासून आजपर्यंत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अखेर आज जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना आदेश दिला आणि उजनी जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून उचलून नवीन मुठा उजवा कालव्यात सोडण्याबाबतचा शासनाचा 6 नोव्हेंबर 2020 आणि 5 जानेवारी 2021 यासह 22 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आलेला आदेश रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले..

दरम्यान आज जलसंपदा विभागाने उजनी धरणातून इंदापूरला मंजूर केलेले पाच टीएमसी पाणी रद्द करत असल्याचे लेखी आदेश काढला आहे. त्यामुळे गेल्या महिना भररापासून सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्ण विराम मिळाला आहे.या निर्णयाचे आंदोलक व शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

हा आदेश रद्द केल्याचे पत्र आमदार संजय शिंदे, कल्याण काळे, भगीरथ भालके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनासमोर उभे राहून माध्यमांना दाखवले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात तिकडे आनंदोत्सव तर इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीच्या आनंदावर पाणी असा दुहेरी आनंद आणि दुःखाचा खेळ आज झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!