इंदापूर तालुका ग्रामसेवक युनियन डी एन ई १३६ इंदापूर तालुका अध्यक्षपदी लक्ष्मीकांत जगताप, सचिवपदी नीलकंठ गिरी यांची आज बिनविरोध निवड.
निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम दुपारी बारा ते सायंकाळी चार या वेळेत पार पडला.

इंदापूर तालुका ग्रामसेवक युनियन डी एन ई १३६ इंदापूर तालुका अध्यक्षपदी लक्ष्मीकांत जगताप, सचिवपदी नीलकंठ गिरी यांची आज बिनविरोध निवड.
निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम दुपारी बारा ते सायंकाळी चार या वेळेत पार पडला.
बारामती वार्तापत्र
(दि. १३ जून २१) रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा पुणे आदेशान्वये इंदापूर तालुका कार्यकारणी २०२१ – २०२६ पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली असता यावेळी मतदार व उमेदवार उपस्थित होते. ही निवडणूक कार्यक्रम पंचायत समिती इंदापूर येथे अल्पबचत सभा गृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कैलास कारंडे व सतीश बोरावके यांच्या उपस्थित पार पडला. निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम दुपारी बारा ते सायंकाळी चार या वेळेत पार पडला. यावेळी इंदापूर तालुका कार्यकारणी उमेदवारांचे बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे आहेत की, अध्यक्षपदी जगताप लक्ष्मीकांत केरबा ,उपाध्यक्षपदी पवार सचिन सिताराम, महिला उपाध्यक्ष पावशे अंबिका अरविंद, सचिव गिरी नीलकंठ दत्तात्रेय, कोषाध्यक्ष संघटक काळे भिवा न्यानदेव, सहसचिव फीरोज मुलतानीखान पठाण, सदस्य रणवरे विजयमला तानाजी, चेंडगे सजाबाई मारुती, लोंढे तुषार भागवत, शेलार रवींद्र अनंता इत्यादींची निवड करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित नवनिर्वाचित उमेदवार यांना शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मांडले.