स्थानिक

उद्यापासुन बारामती सकाळी ०९ ते सायंकाळी ७ पर्यंत चालु… — प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे

सर्व व्यवहार सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उद्यापासुन बारामती सकाळी ०९ ते सायंकाळी ७ पर्यंत चालु…— प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे.

सर्व व्यवहार सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बारामती वार्तापत्र

१४ दिवसांच्या जनता कर्फ्युनंतर बारामती शहर आणि तालुक्यातील सर्व व्यवहार सोमवारपासून सुरु होणार आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत बाजारपेठ सुरु ठेवण्याचा निर्णय आज प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे १४ दिवसांपासून बंद असलेले सर्व व्यवहार सुरळीत होणार आहेत.

YouTube player
  • हॉटेल, जिम, पानपट्टी, शाळा महाविद्यालय या सह केंद्र व राज्य सरकारने ज्यावर प्रतिबंध घातला आहे, अशा बाबी वगळता इतर सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दुकानदार व त्यांचे कर्मचारी तसेच दुकानात येणाऱ्या प्रत्येकाला मास्कचा वापर अनिवार्य असेल. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे हात सॅनेटायझरने स्वच्छ केले जातील. प्रत्येक ग्राहकाचे थर्मल स्क्रिनींग व ऑक्सिजन लेव्हलचीही तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. प्रत्येक ग्राहकाचा नाव पत्ता व मोबाईल क्रमांक नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे.

दरम्यानए किराणा मालाच्या दुकानातून पानपट्टीवरील काही वस्तूंची सर्रास विक्री सुरु असल्याची तक्रार या बैठकीत झाली. अशी विक्री करताना कोणीही दुकानदार आढळल्यास त्यावर कडक कारवाईचा इशारा कांबळे यांनी दिला. याशिवाय बाजारपेठेमध्ये संशयित रुग्णांची तपासणी करण्याबाबतही सूचना करण्यात आली.

बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर, माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सुशील सोमाणी, प्रवीण आहुजा, स्वप्नील मुथा, विजय आगम यांनी या वेळी सूचना मांडल्या. रमणिक मोता, फखरुशेठ भोरी, नरेंद्र मोता, भारत खटावकर, श्यामराव तिवाटणे, शैलेश साळुंके, किरण गांधी, सागर चिंचकर, महेश साळुंके, दीपक मचाले, गणेश फाळके आदी या बैठकीस उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!