कोरोंना विशेष

सीरम पाठोपाठ भारत बायोटेककडूनही Covaxin Vaccine च्या किमती जाहीर; काय असतील दर?

संपूर्ण स्वदेशी असणारी ही लस राज्य सरकारसाठी प्रति डोस 600 रुपये आणि खाजगी रुग्णालयांसाठी 1,200 रुपये प्रति डोस दराने उपलब्ध केली जाणार आहे.

सीरम पाठोपाठ भारत बायोटेककडूनही Covaxin Vaccine च्या किमती जाहीर ; काय असतील दर?

संपूर्ण स्वदेशी असणारी ही लस राज्य सरकारसाठी प्रति डोस 600 रुपये आणि खाजगी रुग्णालयांसाठी 1,200 रुपये प्रति डोस दराने उपलब्ध केली जाणार आहे.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

भारत बायोटेकने संपूर्ण स्वदेशी लस COVAXIN लसीच्या प्रति डोसच्या किमतीची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं की, राज्य सरकारसाठी प्रति डोस 600 रुपये आणि खाजगी रुग्णालयांसाठी 1,200 रुपये प्रति डोस दराने देण्यात येणार आहे. भारत बायोटेकने सांगितलं की, केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार, आम्ही कोवॅक्सिन लसीच्या डोसच्या किमतींची घोषणा केली आहे.

यापूर्वी बुधवारी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने सांगितलं होतं की, “कोविड-19 लस ‘कोविशील्ड’ ची किंमत राज्य सरकारसाठी 400 रुपये प्रति डोस आणि खासजी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस असणार आहे.

कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “150 रुपये प्रति डोसचा सध्याचा करार संपल्यानंतर केंद्र सरकारसाठीही लसीच्या प्रति डोसची किंमत 400 रुपये प्रति लीटर असणार आहे. सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात सांगितलं की, “भारत सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी 50 टक्के आणि उरलेला 50 टक्के साठी राज्य सरकार आणि खाजगी रुग्णालयांसाठी देण्यात येणार आहे.”

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, सरकारच्या निर्देशांनुसार ‘कोविशील्ड’ची किंमत राज्य सरकारसाठी 400 रुपये प्रति डोस आणि खाजगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस असणार आहे. दरम्यान, या किमतीवरुन विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यांचं म्हणणं होतं की, जर केंद्र सरकारला लसीचे डोस 150 रुपयांना उपलब्ध करुन दिले जात आहेत, तर राज्य सरकारला का अधिक किंमतीत का देण्यात येणार?”

‘उत्पादन वाढवण्यासाठी गुंतवणुकीची गरज’, कोविशिल्डच्या किंमतीवरील चर्चेवर सीरमचं स्पष्टीकरण

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आज कोविड 19 प्रतिबंधक लस कोविशिल्डच्या किंमतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आगाऊ निधी मिळाल्यामुळे सुरुवातीला या लसीची किंमत जागतिक पातळीवर कमी होती, परंतु आता लस उत्पादन वाढवण्यात गुंतवणुकीची आवश्यकता आहे, असं स्पष्टीकरण सीरमने दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!