उद्या भारत बंद
शेतकरी संघटनेच्या आंदोलनास सर्व स्तरातून पाठिंबा
बारामती वार्तापत्र
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी दिल्लीत बारा दिवसापासुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातून सर्व पक्ष व सर्व शेतकरी संघटना ,प्रहार संघटना यांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे मोदी सरकार शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शेतकऱ्यांचा विरोध असतानाही कायदे करत आहे. शेतकऱ्याला हमी भाव मिळावा यासाठी कोणतीही तरतूद न करता इतर गोष्टी पुढे करून हा कायदा केल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे त्यामुळे हे आंदोलन सुरू आहे त्याचा परिणाम राज्यातही होणार असून शेतकऱ्यासाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत उद्या बंद असणार आहे
बारामती व्यापारी महासंघा तर्फे उद्याच्या शेतकऱ्यांच्या भारत बंद ला संपूर्ण पाठिंबा
गेल्या 10 वर्षांपासून बारामती व्यापारी महासंघ प्रत्येक वेळेस विविध संघटनेने पुकारलेल्या बंद मध्ये दुपारी 12 पर्यंत बंद पुकारून सहकार्य करते.
त्याप्रमाणे उद्या ही बारामती बंद ही दुपारी 12 पर्यंत आहे.
कुणीही याचा गैरसमज करून घेऊ नये किंवा चुकीच्या अफवा पसरवून तेढ निर्माण करू नये ही विनंती.
कृपया सर्वांनी ठरल्याप्रमाणे दुपारी 12 पर्यंत बंद मध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे.
व्यापारी महासंघ बारामती.