उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 61 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हरित एमआयडीसी सुंदर एमायडिसी अभियान राबविणार … धनंजय जामदार.
बारामती औद्योगिक क्षेत्रात हरित एमआयडीसी सुंदर एमआयडीसी हे अभियान.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 61 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हरित एमआयडीसी सुंदर एमायडिसी अभियान राबविणार … धनंजय जामदार.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 61 व्या वाढदिवसाच्या औचित्त्य साधून बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या माध्यमातून बारामती औद्योगिक क्षेत्रात हरित एमआयडीसी सुंदर एमआयडीसी हे अभियान दिनांक 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2020 या दरम्यान राबविण्यात येणार असून वनविभाग व उद्योजकांच्या सहभागातून किमान एक हजार वृक्ष लागवड करण्यात येईल अशी माहिती बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.
बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या संचालक मंडळाची बैठक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विश्रामगृहात धनंजय जामदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शरद सूर्यवंशी, सचिव अनंत अवचट, खजिनदार राधेशाम सोनार, सदस्य मनोज पोतेकर, संभाजी माने, महादेव गायकवाड, मनोहर गावडे, शेख वकील आदी उपस्थित होते.
हरित एमआयडीसी सुंदर एमआयडीसी या संकल्पनेनुसार बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हे उद्योजक व कंपन्यांना त्यांच्या भूखंडावर कुंपणाच्या आत व बाहेर स्थानिक प्रजातीचे वृक्षरोपण करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहेत.
वृक्षलागवडीच्या संख्येपेक्षा त्यांची जोपासना करण्यावर भर दिला जाणार आहे.वृक्ष लागवडीसाठी स्थानिक प्रजातींची रोपे विनामूल्य उपलब्ध करून फळे व शोभिवंत झाडे यांची रोपे किमान दरात उपलब्ध करून दिली जातील तसेच शास्त्रोक्त लागवडीसाठी संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल अशी ग्वाही बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी उपस्थित पदाधिकार्यांना या बैठकीत दिली.