उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खाजगी सचिव भासवून फसवणूक करणाऱ्यावर बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
भूलथापांना बळी न पडण्याचे पोलिसांनी केले आवाहन
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खाजगी सचिव भासवून फसवणूक करणाऱ्यावर बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
भूलथापांना बळी न पडण्याचे पोलिसांनी केले आवाहन
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खोटी सही करून खाजगी सचिव असल्याचे भासवून तोतयागिरी करून फसवणूक करणाऱ्या आरोपी नामे तुषार तावरे यांच्यावर बारामती शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
अजय कामदार वय 64 वर्षे बांधकाम व्यवसायिक राहणार मुंबई यांना आरोपी नामे तुषार तावरे यांनी दिनांक 14 /10 /2020 रोजी त्यांचे मोबाईल नंबर वर संपर्क साधून मी उपमुख्यमंत्री यांचे कार्यालयातून बोलतोय अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आपले विरुद्ध तक्रार आली आहे मी तुम्हाला व्हाट्सअप ला पाठविली आहे ती बघा असे सांगितल्यानंतर तक्रारदार याने सदरचे व्हाट्सअप चे मेसेज व तक्रारी अर्ज पाहिले असता त्यांचे बांधकाम व्यवसाय संदर्भात तक्रारी अर्ज उपमुख्यमंत्री यांच्या नावे देण्यात आलेले दिसले त्यावर उपमुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ कारवाई करावी असा पोलीस उपायुक्त झोन-9 मुंबई साह्य पोलीस आयुक्त -9 मुंबई व वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एन नगर पोलीस स्टेशन पुणे मुंबई यांना रिमार्क , मारून त्याखाली उपमुख्यमंत्री महोदयांची सही असल्याचे दिसले.
म्हणून अर्जदार यांनी घाबरून जाऊन ,आरोपी नामे तुषार तावरे यांना संपर्क साधला असता तावरे यांनी फिर्यादी यांना तुमच्याविरुद्ध दिलेला अर्ज मी कमिशनर कडे न पाठवता माझ्याकडे ठेवला आहे तुमचे व अर्जदार यांचे जे वाद आहेत ते तीन दिवसात मिटवून घ्या नाहीतर आपल्याविरुद्ध कडक कारवाई होईल त्यावर फिर्यादी यांनी सदर निवेदनावर अजितदादा यांची सही आहे का ? त्यावर आरोपी नामे याने हो अजितदादा यांची सही आहे असे सांगून प्रकरण मिटवून घ्या असे सांगितले सदर बाबत फिर्यादी हे घाबरलेल्या स्थितीत असल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयात संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला असता तुषार तावरे नावाचा कोणीही व्यक्ती कार्यालयात काम करीत नाही आपण अजितदादा उद्या बारामतीत आहेत आपण त्यांना जाऊन सर्व प्रकार सांगा असे सांगितल्याने फिर्यादी हे बारामतीला आले.
ते स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांना भेटले त्यांनी कायदेशीर कारवाई करा असे सांगितले असता त्यांनी नारायण शिरगावकर उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती उपविभागीय यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांची रीतसर तक्रार घेऊन बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 504 /20 20 /भादवि कलम 417 /419/ 420 /464 /468 /511/ अनवे तोतयागिरी करून फसवणूक केलेले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी तुषार तावरे राहणार तारांगण सोसायटी बारामती ता.बारामती जि.पुणे यास अटक करण्यात आली असून सदर गुन्हण्यात आणखीन कोणी साथीदार होता का ? गुन्ह्याचा याचा मुख्य उद्देश काय होता का ?
आरोपीने अजून असे गुन्हे केले आहेत काय ,याचा शोध पोलीस घेत आहेत सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गंपले करीत आहेत. तसेच तुषार तावरे अगर अशा कोणत्याही व्यक्तीने तोतयागिरी करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महाराष्ट्र राज्य यांचे स्वीयसहाय्यक खाजगी सचिव अगर कार्यालयातील अधिकारी असे सांगून फसवणूक केली असेल तर बारामती शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे.